
Tiny Prawns Patties – करंदीच्या वड्या
साहित्य – ३०० ग्रॅम ओली करंदी (कर्दी), २ कांदे बारीक चिरलेले, २ tbl spn क्रश केलेले आले लसूण, ३ बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, २ tbl spn चिंचेचा कोळ, १०० ग्रॅम चण्याचे पीठ, ४ tbl spn तांदळाचे पीठ, १ tea spn हळद , २ १/२ tbl spn सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ.
कृती – सर्वप्रथम करंदीचे डोक्याकडील भाग, वरचे पात्तळ कवच आणि पाय अलगद काढून टाकावे आणि आतील गर फक्त घ्यावा. अशा प्रकारे सर्व करंदी साफ करून पाण्याने २ वेळा धुवून घ्यावीत. आता एका खोलगट भाड्यात करंदी टाकावी आणि सोबत बारीक चिरलेले कांदे, क्रश केलेले आले लसूण, बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, चिंचेचा कोळ, चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद , सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे. आता तव्यावर वड्या तळण्याकरिता तेल टाकून गरम करावे. गॅस ची फ्लेम मध्यम ठेवावी. हातावर थोडे करंदीचे मिश्रण घेऊन गोल आकारात वड्या कराव्यात आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंगापर्यंत तळून घ्याव्यात. आपल्या गरमागरम करंदीच्या वड्या तय्यार !
टीप – तांदळाच्या पीठाने करंदीच्या वड्या कुरकुरीत होतात.
There are no comments