डाळ मटण – Dal mutton
साहित्य – ५०० ग्रॅम बकऱ्याचे मटण, १०० ग्रॅम चण्याची डाळ, २½ tblsp आले लसणाची पेस्ट, १ वाटी कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या, ३ कांदे बारीक चिरलेले, ५० ग्रॅम भाजलेले सुके खोबरे, १ tsp हळद, ३½ tblsp सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ.
कृती – मटण स्वच्छ धुवून घ्यावे. एका कढईत तेल घालून चांगले तापवावे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा तेलात लालसर करून घ्यावा. कांदा लालसर झाल्यानंतर यात आले लसणाची पेस्ट टाकावी आणि परतून घ्यावी. पेस्ट परतून झाल्यानंतर यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला घालावा. मसाला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर यात मटण घालावे. मटण मसाल्यात एकजीव करावे. आता यात वाटीभर कोमट किंव्हा गरम पाणी टाकावे, सोबत अर्धी चण्याची डाळ घालावी आणि मटणासोबत सर्व मिश्रण एकजीव करावे. यावर आता झाकण ठेवून १०/१५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे. ( मध्ये मध्ये परतून घ्यावे. ) एका बाजूला आता पाट्यावर किंव्हा मिक्सर मध्ये भाजलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि मिरची, उरलेली चणाडाळ यांची पेस्ट ( वाटण ) तयार करून घ्यावं. मटण वाफेवर शिजवून झाल्यानंतर यात हे तयार वाटण घालावे आणि मटणात चांगले एकजीव करावे. यात ग्रेव्हीसाठी पुन्हा गरम किंव्हा कोमट पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्या चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण घोळून घ्यावे. यावर आता झाकण ठेवून ३० मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे. ( मध्ये मध्ये परतून घ्यावे. ) ३० मिनिटानंतर गॅस बंद करावा. आपले डाळ मटण तय्यार ! भाकरी किंव्हा वाफाळत्या भातासोबत गरमागरम सर्व्ह करावे.
Wow fantastic recipe.. waiting for my masala