• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Egg Lapeta – अंड्याचा लपेटा

साहित्य – ४ उकडलेली अंडी, ९/१० काजू, १ कांदा तळण्याकरिता, ५० ग्रॅम भाजलेलं सुकं खोबरं, एक टोमॅटो बारीक चिरलेलं, एक कांदा बारीक चिरलेला, २ कच्ची अंडी, चवीनुसार मीठ, १ tsp हळद , २ tblsp ठेचलेलं आलं लसूण, ½ tblsp कसुरी मेथी, ७/८ कडीपत्त्याची पाने, मूठभर कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली मिरची. २½ tblsp सिक्रेट कोळी मसाला.

कृती – एका पॅन किंवा कढईत १-२ चमचे तेल टाकून कांदा तेलात तांबूस करून घ्या. आता मिक्सर किंव्हा पाट्यावर भाजलेलं सुकं खोबरं, तळलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरचीचे पात्तळ वाटण तयार करून घ्या. आता पॅनवर १ tblsp तेल टाकून दोन अंड्याचे ऑम्लेट तयार करून घ्या आणि त्याला एका खोलगट प्लेटमध्ये काढून घ्या. आता कढईत ६ चमचे तेल चांगले गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटो मऊसर करून घ्या. कांदा टोमॅटो चांगलं मऊसर झाल्यानंतर यात आलं लसूण, कडीपत्त्याची पाने, कसुरी मेथी, हळद, सिक्रेट कोळी मसाला आणि तयार वाटण घालून घ्या. सर्व मिश्रणाला एकजीव करा आणि चांगले परतून घ्या. वाटाणाच्या वाटीत जर थोडेफार मिश्रण उरले असेल तर त्यात पाणी घालून ते सुद्धा यात टाकावे. आता यात उकडलेली अंडी घाला. ( उकडलेल्या अंड्यांना लहान चिरा टोचून घ्या. तुमच्या सोयीनुसार अंड्याचे प्रमाण वाढवू शकता.) आता यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साधारण १ ग्लासभर पाणी घालून अंडी या मिश्रणात चांगली घोळून घ्या. गॅसची आच माध्यम करून १०/१५ मिनिटे चांगले उकळून घ्या. छान उकळी करून घेतल्यानंतर गॅस बंद करावा. लटपटीत अंड्याचा लपेटा तयार आहे. आता या लपेटाला ऑम्लेटच्या प्लेटमध्ये काढून गरमागरम वाढा !

टीप – १) ज्यांना कोलेस्टेरॉल त्रास असेल किंव्हा रुग्ण असतील तर हि रेसिपी टाळावी.
२) काजू नसल्यास यात मगजचा वापर करू शकता. किंव्हा काजू आणि मगज हे दोन्ही नसल्यास बाकीच्या साहित्यांनी सुद्धा हि डिश सुंदर होते, फरक कि यात ग्रेव्हीला स्मूथ आणि क्रिमीपणा येणार नाही.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *