• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Why Add Salt To The Before End Of The Cooking

जेवण कुठल्याही प्रकारचे असो. जगाच्या कुठल्याही टोकावर जा.जेवणात एक घटक अतिशय महत्वाचा मानला जातो.शिवाय एकमेव आणि सामायिक असा घटक म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवणाला जेवण म्हणताच येणार नाही.किंबहुना ते पूर्ण होऊच शकत नाही. हल्ली आपल्याला मीठ नाममात्र रुपयांत मिळत असले तरी एकेकाळी मीठाला आर्थिक रुपात वापरले जात असे. मीठाला अगदी लग्नात मुलीला सासरी घेऊन जाताना देणाऱ्या वस्तूंमधील एक मौल्यवान अशी एक वस्तु होती. मिठाला इतके महत्त्व त्याच्या गुणांमुळेच मिळालेले आहे. शिवाय इंग्रज भारतात आले तेव्ह त्यांनी मिठावर आकरालेल्या कराच्या निषेधार्थ गांधीजींनी केलेला सत्याग्रह आणि दांडीयात्रेचा इतिहास आपण शिकलेलो आहोतच.

इतका मोठा इतिहास असलेल्या मिठाबद्दलच आज आपण बोलणार आहोत.कारण आपल्या चॅनेलमधील माझ्या बऱ्याच मित्र मंडळींनी व्हिडीओ खाली काही दिवसांपासून प्रतिक्रिया दिलेल्या की तुम्ही मीठ अगोदर का नाही घालत किंव्हा नेहमी मीठ शेवटी का टाकता ? म्हंटलं दरवेळी तुम्हाला कॉमेंट करून सांगण्यापेक्षा यावर एक स्पेशल व्हिडिओच का बनवू नये ? म्हणजे तुमचे शंका नीरसन पण होईल आणि आपल्या इतर मित्रमंडळींना देखील याची सविस्तर माहिती मिळेल.

असं काही नाही की अगोदर आणि नंतर मीठ टाकल्याने काही विशेष फरक पडतो. हो… पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पदार्थाची चव अनुक्रमानुसार अगदी कोणत्या तापमानापर्यंत किती त्यात एकजीव होते याचा तंतोतंत अंदाज असायला हवा. नाहीतर शेवटी असे होते की मीठाचे प्रमाण कमी जास्त होते आणि त्या पदार्थाचा घोळ होतो. बहुदा काही वेळा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा सोडिअम क्लोराईड बहुतांश प्रमाणात असते किंवा काही भाज्यांमध्ये ते नसतेसुद्धा.

आता सोडिअम क्लोराईड म्हणजे नेमके काय ? तर… सोडिअम + क्लोराईड = मीठ ( सोडिअम ४०% आणि क्लोराईड ६०% ). मग काहीवेळा काय होते की, यासर्वांची काळजी घेऊन जरी मीठ अगोदर कमी टाकले तरी तुम्हाला ते शेवटी चाखून त्याचे प्रमाण वाढवावे लागते, नाहीतर तो पदार्थ अळणी होण्याचीदेखील शक्यता असते आणि समजा मीठ जास्त प्रमाणात गेले तर आपल्या स्वयंपाकाला काहीच अर्थ शिल्लक राहणार नाही. त्यापेक्षा यावर सोपा उपाय म्हणजे शेवटी १० मिनिटे शिल्लक असताना मीठ टाकले तरी चालते आणि ते उत्तमच. आणि हो जर काही भाज्या टणक (hard) असतील तर त्यांना मऊसर करून त्याची शिजवण्याची प्रक्रिया जलद करावयाची असेल तर सुरुवातीस थोड्या मीठाचा वापर करू शकता. जसे कांदा, कोबी, बटाटे अशा अनेक पदार्थांना मिठाचा वापर करून त्यांची cooking process जलद करू शकता. म्हणून सर्वांची सवय असल्यामुळे मी नेहमी मीठाचा वापर शेवटी करतो. मी तसं साहित्यांच्या यादीत आवर्जून उल्लेख ही करतो की, मीठ चवीनुसार… !

जेवणात किंवा कोणत्याही पदार्थात मीठ हे चवीनुसार असलेले कधीही चांगलेच. एखाद्या पदार्थात चुकून मीठ जास्त प्रमाणात गेले तर नेमके काय करायचे हे देखील सांगतो…

१. समजा कोणतीही भाजी बनवत असाल तर त्यात थोडे खोबरे घालून किंवा त्याच भाजीचे थोडे प्रमाण वाढवून त्याची चव संतुलित करू शकतो.
२.पोह्यात मीठ जास्त गेले तर त्यात पुन्हा थोडे पोहे भिजवून घालू शकता आणि समजा सुरुवातीलाच असे झाले असेल की आपण बाजारातून जेवढे पोहे आणले असतील तेवढे सर्वच बनवले असेल तर मीठ जास्त झाल्यावर त्याला बॅलन्स कसरण्याचा उपाय काय तर यावरही तोडगा आहे आपल्याजवळ. ब्रेड, नरम लादी पाव किंवा शिळी तांदळाच्या भाकरीची थोडी मिक्सरमध्ये भरड घालू शकता.
३.डाळीत, मासळीत किंवा चिकन , मटण अशा कोणत्याही ग्रेव्ही पदार्थात जर मीठ जास्त गेले तर भाताची पेज, खोबरे किंवा थोडेफार पाणी घालून त्यातील मिठाचे प्रमाण कमी करू शकता.
४. नाहीतर यालाच लागून दुसरा उपाय म्हणजे कच्चे बटाटे किंवा चपातीला आपण जे पीठ मळतो त्याचे छोटेछोटे गोळे बनवून त्यात ७/८ मिनिटे सोडावे आणि नंतर काढून टाकावे याने देखील मिठाचे प्रमाण कमी झालेले दिसून येईल. आणि मी जेवढे हि उपाय सांगितले आहेत त्यावर उपाय म्हणून कोणतीच सामग्री जर तुमच्याजवळ उपलब्ध नसेल तर माझा सल्ला हाच राहील कि तो पदार्थ खाणे टाळून द्या. कारण शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हातापायांच्या लहानलहान रक्तवाहिन्यांच्या भिंतींलगत जमा होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो ज्याला आपण ब्लड प्रेशर ( रक्तदाब)म्हणून नेहमी उल्लेख करत असतो. हा विकार होण्यास बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. जसं अति मानसिक ताण, आनुवंशिकता, जंक फूड/फास्ट फूडचा समावेश, खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली आणि हो .. आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे हे मुख्य कारण. कारण आपण बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण जरी ठेवले तरी कळत नकळत मीठाचे आपल्या शरीरात विविध पदार्थ सेवन केल्याने होतच असते.

आता समजलं का कोणत्याही पदार्थात मीठ शेवटी का घालतो ? खरं बघायला गेलं तर हे मी सुरुवातीलाच सांगायला हवं होतं पण ठीक आहे उशिरा का होईना तुमच्या शंकादेखील सोडवायला मिळाल्या आणि त्याच बरोबर मीठासंबंधित थोडीफार माहितीही शेअर करण्याची संधी मिळाली. आता मला वाटतंय की तुमच्या शंका दूर झाल्या असतील. या संपूर्ण व्हिडिओतून १०० नाही पण माझ्याकडून १ टक्का जरी या मीठासंबंधित तुम्हाला माहिती मिळाली असेल तर व्हिडीओ लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. असाच एक छान व्हिडीओ घेऊन मी पुन्हा लवकरच तुम्हाला भेटणार आहे, तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि कोळी रेसिपीज एन्जॉय करा. धन्यवाद !

 

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *