• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

सुरमईचं आंबट

साहित्य – सुरमईचे ५ ते ६ ताजे तुकडे, हळद, ओरीजनल सिक्रेट कोळी मसाला, तीन हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, तीन छोटे तुकडे आले, ९ ते १० लसुन पाकळ्या, अर्धी वाटी भाजलेले सुखे खोबरे, ३ चमचे चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ आणि ४ मोठे चमचे तेल.

कृती – सर्व प्रथम तीन हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, तीन छोटे तुकडे आले, ९ ते १० लसुन पाकळ्या, अर्धी वाटी भाजलेले सुखे खोबरे यांचे वाटण ( पेस्ट ) तयार करून घ्यायची. एका पातेल्यात ४ चमचे तेल चांगले गरम करून तयार झालेले सर्व वाटण तेलात चांगले परतून घ्यावे. वाटण परतून झाल्यावर त्यात एक छोटा चमचा हळद टाकावी. ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. सर्व मसाले एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे आणि जो पर्यंत या मासाल्यातून तेल बाजूला होत नाही तो पर्यंत सतत परतत राहावे. आपण पाहू शकता थोड्यावेळाने मासाल्यातून तेल पूर्णपणे बाजूला सुटून एक ताव निघाला दिसून येईल. आता यात सुरमई चे तुकडे सोडावे. सुरमईचे तुकडे या मसाल्यात चांगले मिक्स करून १ मिनिटे परतून घ्यायचे. नंतर यात रस्स्यासाठी पाणी टाकावे ( पाणी टाकताना आपल्या सर्व मसाल्याची पात्रता बघूनच पाणी टाकावे ) पाणी टाकल्यावर सर्व मसाले चांगले घोळून घ्यावे आणि एक उकळी काढून घ्यावी. उकळी आल्यावर ३ मोठे चमचे चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ टाकायचे. सर्व मिश्रण चांगले घोळून घ्यायचे आणि पुन्हा एकदा उकळी काढायची. पुन्हा दुसरी उकळी आल्यावर ५ मिनिटांनी आता आपला गॅस बंद करायचा. तयार आहे एकदम गरमागरम झणझणीत अस्सल कोळी पद्धतीतले ‘सुरमईचे आंबट’

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *