• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Steem Modak – उकडीचे मोदक

साहित्य :- ५०० ग्रॅम उकडीच्या मोदकाचे पीठ. हे पीठ तयार करण्यासाठी ५०० ग्रॅम भाकरीचे तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते गाळून २ उन्हामध्ये चांगले सुकवून त्याला बारीक दळून घ्या. ३०० ग्रॅम ओल्या नारळाचा खीस, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, १ चमचा वेलदोड्याची पूड, किसमीस, एक वाटी साजूक तूप, २ चमचे तीळ, एक छोटा चमचा मीठ , एक वाटी गूळ

कृती :- सर्वप्रथम मोदकाचे सारण तयार करून घेऊया. गरम पॅन मध्ये एक वाटी साजूक तूप टाकून गरम करावे, तूप गरम झाल्यावर त्यात गूळ टाकावे, गूळ तुपात पूर्ण विरघळून घ्यावे, त्या नंतर यात ओल्या नारळाचा खीस टाकावा. सर्व मिश्रण एकजीव करावे. आता यात वेलदोड्याची पूड टाकावी. ड्रायफ्रूट्स टाकावे. तीळ टाकावे आणि सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावे. आता या मिश्रणाला चांगले वाफेवर शिजू द्यावे. मध्ये मध्ये परतून घ्यावे. आपले मोदकाचे सारण तयार आहे. मोदकाची उकड काढण्यासाठी ४०० मीली पाणी घावे. त्यात एक चमचा साजूक तूप टाकावे. एक छोटा चमचा मीठ टाकावे आणि चांगले उकळून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर यात उकडीच्या मोदकाचे पीठ टाकावे. उकड तयार झाल्यावर तीला एका परातीत घेऊन चांगले मसळून घ्यावे. मिठाचे मध्यम गोळे तयार करून त्याच्या अशा प्रकारे गोलाकारात पाऱ्या तयार करून घ्याव्यात. आता या पाऱ्यांना दोन बोटांच्या साहाय्याने कडे पाडून घ्यावेत. कडे पाडून झाल्यावर त्यात तयार झालेले आपले सारण टाकावे . आता पाऱ्यांना अलगद हाताने बंद करून मोदकाच्या शेप मध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. याच पद्धतीने आपण बाकीचेही मोदक तयार करून घ्यावेत. या मोदकांना एका चाळणीत ठेवायचे. या चाळणीला अगोदर बोटाने तेल फिरवून घ्यायचे म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही. आता एका स्टीमर च्या भांड्यात मोदक वाफविण्याकरिता साधारण ६५० मीली पाणी टाकावे. गॅस मध्यम ठेवून १५ मिनिटे सर्व मोदक वाफेवर शिजवून घ्यावे. १५ मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यावा. आपले उकडीचे मोदक तय्यार आहेत. मोदक गरम असतानाच एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत. नैवेद्याच्या थाळीत सजवून बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवावा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *