• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Spicy Pomfret curry – सरंग्याचं आंबट

साहित्य – एक अख्खा सरंगा ( मोठा पापलेट ), एक वाटी कोथिंबीर, दिड इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, ३  १/२ tbl spn चिंचेचा कोळ, ३ tbl spn सिक्रेट कोळी मसाला, १ Tspn हळद आणि चवीनुसार मीठ.

कृती – सर्व प्रथम सरंगा स्वच्छ करून त्याचे उभे एक बोटीचे तुकडे करून घ्यावेत. पाट्यावर किंव्हा मिक्सर मध्ये कोथिंबीर, आले-लसूण पाकळ्या आणि मिरचीचे वाटण तयार करून घ्या. कढईत ३ tbl spn तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात तयार वाटण, हळद टाका आणि सोबत सिक्रेट कोळी मसाला देखील टाकून घ्या. मसाले तेलात परतून घ्या. मसाले परतून झाल्यानंतर यार सारंग्याचे तुकडे सोडा. सारंग्याचे तुकडे छान मसाल्यात घोळून घ्या. गॅस ची आच मध्यम ठेवा. आता यात रस्स्यासाठी सोयीनुसार साधे पाणी टाका. पाणी जास्त हि टाकू नका ( सारंग्याचे तुकडे बुडतील इतके पाणी ). सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. एकजीव करून झाल्यानंतर पहिली ५ मिनिटे उकळी काढा. ( गॅसची आच आता मध्यम पेक्षा थोडी वाढवा. ) ५ मिनिटांनंतर यात चिंचेचा कोळ आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. मिश्रण एकजीव करून घ्या. आता ७-८ मिनिटे शेवटची उकळी काढा. सरंग्याचं आंबट तय्यार ! गॅस बंद करून वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि गरमागरम तांदळाच्या भाकरी सोबत किंव्हा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *