• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Spicy gavthi koli mutton curry – झणझणीत गावठी कोळी मटण रस्सा

साहित्य – ७५० ग्रॅम बकऱ्याचे मटण, ३ tbl spn आले, लसूण आणि मिरची पेस्ट (१६ लसूण पाकळ्या, १ १/२ इंच आले आणि ३ हिरव्या मिरच्या), एक वाटी कोथिंबीर, एक अख्खा कांदा, ३ tbl सिक्रेट कोळी मसाला, १ १/२ tea spn हळद, २ अख्खे लसणाचे कांदे, स्मोक देण्याकरिता २ कोळशाचे खडे आणि चवीनुसार मीठ.

कृती – प्रथम मटण २ पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मटण कोरडे करून घ्या.  एका भांड्यात मटण घेऊन त्यावर १/२ tea spn हळद आणि १/२ tbl spn मीठ टाकून मटणाला चांगले चोळून घ्या. मटण १०-१५ मिनिटे मुरवत ठेवा. पॅन मध्ये २ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. मुरवलेले मटण तेलात वाफेवर ५०% शिजवून घ्या. मध्ये मध्ये परतत राहा. गॅस मध्यम आचेवर ठेवा.  मटणातून शिजत असताना पाणी सुटले असेल तर ते एका बाउल मध्ये काढून घ्या. हेच पाणी आपल्याला नंतर मटण बनवताना उपयोगी पडेल. ५०% मटण वाफेवर शिजल्यानंतर या मटणाला स्मोक द्या. स्मोक देण्याकरिया २ कोळशे गॅसवर पेटवून त्यांना एका छोट्या प्लेट मध्ये काढून घ्या. हि प्लेट मटणाच्या मधोमध ठेवून त्यावर तेलाचे २-३ थेंब टाका. स्मोक सुटण्यास सुरुवात होईल. लगेच वर झाकण ठेवून संपूर्ण स्मोक हवाबंद करून घ्या.

आता अख्खा कांदा गॅस वर चांगला भाजून घ्या. ( कांदा सालासकट असला तरी चालेल. कांदा भाजल्यानंतर जळालेली साले काढून घ्या. पण कांदा चुकूनही पाण्याने धुवू नका, नाहीतर त्याचा स्मोकी सुगंध निघून जाईल. ) एका कढईत किव्हा मोठ्या खोलगट भांड्या मध्ये ३-४ tbl spn तेल टाकून तापवून घ्या आणि त्यात आले लसूण मिरची पेस्ट टाका. तेलात चांगली परतून घ्या. पेस्ट परतून झाल्यानंतर यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाका. मसाला तेलात परतून घ्या. सुरुवातीचा मटणाला जे पाणी सुटले होते ते देखील यात घालून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. एकजीव करून झाल्यानंतर यात १ ग्लास गरम पाणी टाका. संपूर्ण मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. एकजीव झाल्यावर यावर झाकण ठेवून वाफेवर १५ मिनिटे शिजवून घ्या. गॅसची आच मध्यम ठेवा. मध्ये मध्ये परतत राहा.

मटण वाफेवर शिजत आहे तोपर्यंत एका बाजूला वाटण तयार करून घ्या. भाजलेला कांदा प्रथम पाट्यावर ठेचून घ्या आणि सोबत कोथिंबीर, भाजलेलं सुकं खोबरं टाकून याचं बारीक वाटण तयार करून घ्या. (हे वाटण मिक्सर मध्ये हि वाटू शकता.) तयार वाटण मटणात घाला. मटण परतून चांगले एकजीव करून घ्या. लसणाचे कांदे या मटणात सोडा. पुन्हा यात १ ग्लास गरम पाणी टाकून एकजीव करा आणि २५-३० मिनिटे वाफेवर शिजवा. मध्ये मध्ये परतून घ्या. (जर यात पाणी कमी दिसू लागल्यास थोडे गरम पाणी यात घाला आणि पाणी जास्त वाटू लागल्यास २० मिनिटानंतर झाकण उघडे करून मोठ्या याचे वर उकळून घ्या. मटण चांगले शिजल्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून वाफाळत्या भातासोबत किंव्हा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा. झणझणीत गावठी कोळी मटण रस्सा तय्यार !

टीप : या रेसिपी मध्ये चुकूनही थंड पाण्याचा वापर करू नका. मटण शिजत असताना त्याची संपूर्ण प्रक्रिया तेज तापमानीत असते आणि असे असताना जर आपण यात थंड पाणी टाकले तर मटण आकसून जाईल आणि त्यास शिजण्यास बराचसा वेळ देखील लागू शकतो. शक्यतो मटणावर झाकण ठेवताना खोलगट थाळी वापरा आणि त्यावर पाणी ठेवून वाफ काढा. झाकणावर पाणी ठेवल्याने  पाणी आपल्याला या मटणात वापरायलाहि मिळेल आणि खाली वाफेवरच्या थेंब थेंब पाण्याने मटण लवकर शिजण्यास मदत देखील होईल. जर आपण हे मटण चुलीवर बनवत असाल तर यात कोळशाचा स्मोक देऊ नये.        

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *