
Spicy Crispy SHev – तिखट शेवया
साहित्य – ५०० ग्रॅम चण्याचे पीठ (बेसन), २ tbl spn मिरची पावडर, १/२ tea spn हिंग, १ tea spn हळद, १ tbl spn ओवा, चवीनुसार मीठ आणि शेवया तळण्याकरिता तेल.
कृती – सर्वप्रथम ४ tbl spn तेल मध्यम गरम करून घ्यावे. (गरम तेल पिठात मिक्स केल्याने शेवया खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात.) परातीत चण्याचे पीठ काढून घ्यावे. गरम केलेले तेल पिठात सोडावे आणि सोबत मिरची पावडर, हिंग, हळद, ओवा, चवीनुसार मीठ टाकावे आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करावे. हळूहळू पाणी टाकून पीठ चपातीला जसा पिठाचा गोळा तयार करतो त्याहून थोडे नरम पीठ मळून घ्यावे. शेवयाच्या साच्यात पिठाचा गोळा टाकावा आणि गरम तेलात शेवया पाडून सोनेरी रंगापर्यंत तळून घ्याव्यात. शेवया टिशू पेपरवर काढून घ्याव्यात आणि हवाबंद बरणीत झाकून ठेवाव्यात. आपल्या तिखट कुरकुरीत शेवया तय्यार !
There are no comments