• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Shankarpali – शंकरपाळी

साहित्य – ५०० ग्रॅम मैदा, ३ tbl spn बारीक रवा, ८० ग्रॅम साजूक तूप, १०० ग्रॅम साखर, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती – सर्वप्रथम एका पॅन मध्ये  साजूक तूप, साखर आणि १०० मी.ली. पाणी एकत्र करून मध्यम गॅस वर एक उकळी आणून पाक तयार करून घ्यावा. पाक तयार झाल्यावर त्याला थंड करून घ्यावा. आता एका परातीमध्ये मैदा, मीठ आणि रवा एकजीव करून घ्यावा. नंतर यात तयार केलेला पाक हळूहळू टाकून पीठ मळून घ्यावे. पिठाचा गोळा जास्त घट्ट आणि नरम नसावा. ( पाक टाकताना सर्व एकत्रित टाकू नये. पिठाचा अंदाज घेऊनच बाकीचा पाक त्यात समावेश करावा. ) पीठ मळून झाल्यानंतर त्याचे माध्यम गोळे करावे आणि चपातीपेक्षा मोठ्या आकारात लाटून घ्यावे. आता एका चकतीच्या साहाय्याने त्रिकोणी आकारात शंकरपाळ्या तयार कराव्यात. एका कढईत तेल चांगले तापवून त्यात शंकर पाळ्या तळून घ्याव्यात. गॅसची आच मंद असावी. शंकरपाळीला तपकिरी रंग आल्यावर टिशू पेपरवर काढून घ्याव्यात.

टीप शंकरपाळ्या मोठ्या आचेवर तळू नये, नाहीतर शंकरपाळीला फक्त वरून रंग येईल आणि आतून कच्च्याच राहतील.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *