• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

मासे विक्री ते खवय्येगीरी

वर्षानुवर्षं ससून डॉक, भाऊचा धक्का, क्रॉफर्ड माकेर्ट इथून मुंबईच्या कानाकोपऱ्यात मासे वितरित होतात. समुदात दिवसभराची फेरी मारून आलेल्या छोट्या बोटी व आठ-दहा दिवस समुदात मासेमारी करून आलेल्या मोठ्या बोटी मध्यरात्री किंवा पहाटे ससून डॉकच्या जेट्टीवर माल उतरवतात. सकाळी साडेपाच वाजल्या-पासून इथे मासेविक्रीची लगबग सुरू होते. मासेविक्रीची इथली पद्धत अर्थशास्त्र व व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्यांना भुरळ पाडेल अशीच आहे. माशांचा लिलाव करणारा विक्रेता आणि त्याच्याकडून टोपलीभर मासे विकत घेणारी कोळीण यांच्यातील रम्य संवाद ऐकणंही मनोरंजक असतं. माशांच्या विक्री-बरोबरच कोळणींच्या टोपल्यांवर लक्ष ठेवून त्यांची सुरक्षितता बघणारे, मासे टिकून राहावे यासाठी बर्फाचा चुरा विकणारे अशी मंडळीही या परिसरात भेटतात.

ससून डॉकमध्ये मासे लिलावपद्धतीने विकले जातात; तर क्रॉफर्ड माकेर्टमध्ये किलोच्या मापाने मासेविक्री होते. पूर्वी २० रुपये किलोने मिळणारे सरंगे आता ८०० ते एक हजार रु. किलो या भावाने खरेदी करावे लागतात. करंदीचा वाटा पाच रुपयांवरून २० रुपयांवर आलाय मित्रांनो या दरवाढी मागे हि बरीच कारणे आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाही. जसे डीझेल महागले, मासे ने आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था महागली, प्रदूषणामुळे मासे कमी त्यात दर्यातच अर्धी मासळी लुटणारे आपलेच स्थानिक पोलिस या सर्वांचा विचार करूनच आज मासळी देखील महागली. असो हा भाग जरा मी आमच्या अंतर्गतातला सांगितला पण, ज्या परिसरात मासेविक्री करायची, तिथल्या लोकांच्या राहणीमानानुसार विक्रेते मासे खरेदी करतात. त्यांच्या रोजच्या गिऱ्हाईकांबरोबर आसपासचे हॉटेलवालेही सुरमई, पापलेट व कोलंबी हे मासे त्यांच्याकडून प्रामुख्याने घेतात. पूवीर्पेक्षा हॉटेलवाल्यांचा कल मासे खरेदीकडे अधिक असतो. प्रदूषणामुळे मासे कमी झालेत; पण खाणारे वाढले आहेत. माशांचे भाव वाढले तरीही गलेलठ्ठ पगार कमावणारे लोक चढ्या भावातही मासे खरेदी करतात.

आजचा जमाना मॉलमध्ये जाऊन फास्टफूड खाण्याचा असला, तरीही मासेहार करणाऱ्यांची पावलं मुंबईच्या कोळीवाड्यातील तळलेली खमंग कोलंबी खाण्यासाठी किंवा कोकण आणि मालवण किनाऱ्याकडेच वळतात. जोवर समुद अथांग आहे आणि त्यात विहार करणारे वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत, तोवर मासेहारावर जगणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या जिभेचे चोचले अखंडपणे पुरविले जाणार आहेत.

 

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *