
Rooster recipe – चुलीवरचा शेतातला गावठी कोंबडा
साहित्य – एक गावठी कोंबडा, २ वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे बारीक वाटण (१५० ग्रॅम), आल्याची देठे ( पर्यायी ) १ वाटी कोथिंबीर, ९-१० कडीपत्त्याची पाने, १४ ते १५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, २ कांदे उभे काप केलेले, २ इंचाचे उभे काप केलेले आले, ३ ते ४ काप केलेल्या हिरव्या मिरच्या, २ बारीक काप केलेली टोमॅटो. half tbl spn हळद, ५ tbl spn सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ.
कृती – प्रथम कोंबडा आतून आणि बाहेरून साफ करून घ्यावा आणि त्याला चुलीवर ५ मिनिटे सर्व बाजूने शेकवून घ्यावे. ( सर्व बाजूने शेकवून घेतल्यावर कोंबड्याला एक सुंदर स्मोकी फ्लेव्हर मिळेल. चूल नसल्यास गॅसचा वापर करू शकता. ) कोंबडा चुलीवर शेकवून झाल्यावर त्याचे मध्यम आकारात आपल्या सोयीनुसार तुकडे करून घ्या. एका पातेल्यात ५ चमचे tbl spn तेल टाकून चांगले गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात सर्वप्रथम २ उभे काप केलेले कांदे टाकून लालसर रंगापर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यात काडिपत्ते आणि ठेचलेला लसूण टाका आणि परतून घ्या. आता यात आल्याची देठे टाका, ऊभं काप केलेलं आलं टाका, काप केलेली मिरची टाका. सर्व पदार्थ आता चांगले परतून घ्या. म्हणजे प्रत्येकातून स्वतःचे सुगंध सुटायला सुरुवात होईल. यात आता कोंबड्याचे तुकडे सोडा आणि चांगले परतून घ्या. परतून झाल्यावर यात हळद टाका. ५ चमचे सिक्रेट कोळी मसाला टाका. (जर आपण कमी तिखट पसंत करीत असाल तर आपल्या चवीनुसार मसाला कमी अधिक करू शकता.) संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. आता कोंबडा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून घ्या, म्हणजे हेच पाणी गरम झाल्यावर त्यात आपल्याला उपयोगी पडेल. कोंबडा किमान १५ मिनिटे वाफेकर शिजवून घ्या. मध्ये मध्ये त्याला परतून घ्या म्हणजे आतील मसाले खाली बुडाला लागणार नाहीत. १५ मिनिटे वाफ काढून झाल्यावर त्यात बारीक काप केलेली टोमॅटो सोडा. ( लक्षात ठेवा टोमॅटो सर्वात शेवटी टाकायची आहेत कारण गावठी कोंबडा असल्यामुळे त्याला शिजायला बराच वेळ लागतो आणि आंबटपणामुळे त्याचे मांस आकसून जाईल आणि कोंबडा लवकर शिजणार नाही. म्हणून कोंबडा आधी शिजवून घ्या आणि नंतर टोमॅटो टाकू शकता. ) पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. टोमॅटोला पाणी सुटे पर्यंत किंव्हा विरघळे पर्यंत याला ५ मिनिटे पुन्हा वाफ द्या. टोमॅटोला पाणी सुटल्यावर यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण टाका. चवीनुसार मीठ टाका. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि जर तुम्हाला यात थोडा रस्सा हवा असल्यास त्यात एक ग्लास कोमट पाणी टाकून चांगली ३५ ते ४० मिनिटे उकळी काढा. चांगल्या प्रकारे उकळून झाल्यानंतर पातेलं चुलीवरून काढून बाजूला ठेवा आणि गरमागरम एका छान भांड्यात सर्व्ह करून चुलीवरच्या कोंबड्याच्या मनमुराद आस्वाद घ्या.
Nice