
Prawns Masala – कोळंबी मसाला
साहित्य – २५० ग्रॅम कोळंबी, २ कांदे बारीक चिरलेले, २ टोमॅटो बारीक चिरलेली, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ १/२ tbl spn सिक्रेट कोळी मसाला, १ tea spn हळद, चवीनुसार मीठ.
कृती – सर्व प्रथम कोळंबी साफ करुन पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. पॅनमध्ये ४ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात चिरलेला कांदा, मिरची टाकून तांबूस रंगापर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाका. टोमॅटो देखील यात परतून घ्या. टोमॅटो परतून झाल्यानंतर यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाका. मसाले परतून घ्या. मसाले परतून झाल्यानंतर यात कोळंबी टाका. कोळंबी मसाल्यात एकजीव करून घ्या. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या सोबत अर्धी वाटी पाणी टाकून एकजीव करून घ्या. आता वर झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. १० मिनिटानंतर गॅस बंद करा आणि वर कोथिंबीर टाकून लिंबाच्या फोडीसह गरमागरम सर्व्ह करा.
Wow …..yummy recipe
Wow …..Chan ahe recipe
Chef Bhoir you are exceptional. You come out with some out of the box recepes. Your recepes are not only pleasing to the eye but appetizing. So buddy get along with the good job and give us some more. Cheers.