• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Prawns Koliwada – प्रॉन्स कोळीवाडा

साहित्य – ५०० ग्रॅम कोळंबी, १ चमचा काळीमिरी पावडर, २०० ग्रॅम मैदा, १ चमचा मक्याचं पीठ ( कॉर्न स्टार्चसाठी वापरणारे), १ चमचा बारीक रवा, अडीच चमचे आले, लसूण आणि मिरची क्रश केलेले ( मिरची आपल्या तिखटानुसार कमी अधिक घेऊ शकता. ) ५० ग्रॅम तांदळाचे पीठ, अडीच चमचे काश्मिरी मिरचीची पावडर. एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.

कृती – सर्व प्रथम कोळंबी स्वच्छ करून घ्यावी आणि शेपटी कडील भाग अर्धा ठेवावा. आता कोळंबीचे मॅरिनेशन करून घ्यायचे. यात एक चमचा काळीमिरी पावडर, लिंबाचा रस, क्रश केलेलं आले लसूण आणि मिरची, व चिमूटभर मीठ टाकून ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावे. कोटिंगसाठी आपल्याला वरील सामग्री प्रमाणे मैदा, मक्याचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ, काश्मिरी मिर्ची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. आता यात थोडे थोडे पाणी टाकून घोळून घ्यावे. कोटिंग जास्त पात्तळ बनवू नये.  मॅरीनेट केलेल्या सर्व कोळंबी आता या कोटिंग मध्ये टाकून चांगल्या मिक्स करून घोळून घ्याव्या. यात रवा, तांदळाचे पीठ आणि मक्याचे पीठ असल्यामुळे कोटिंग मस्त पापडासारखी कुरकुरीत होईल. कढईत तेल चांगले गरम करून गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी.  यानंतर एक एक करून कोळंबी उकळत्या तेलात सोडून चांगल्या सोनेरी रंगापर्यंत तळून घ्याव्या. प्रॉन्स कोळीवाडा तय्यार !

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *