• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

mutton kheema – मटण खिमा

साहित्य – ५०० ग्रॅम मटण खीमा, २ लहान टोमॅटो बारीक काप केलेली, १ मोठा कांदा बारीक काप केलेला, १ tbl spn स्पून हळद, ३ tbl spn ओरिजन सिक्रेट कोळी मसाला, अर्धी वाटी हिरवं वाटण ( या वाटणात १२-१५ लसूण पाकळ्या, २ इंचाचे आले, ३ हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेऊन बारीक पेस्ट तयार करण्यात अली आहे. ), ४-५ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट (८० ग्रॅम), चवीनुसार मीठ.

कृती – सर्वप्रथम एका पॅन मध्ये ३ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा तांबूस रंगापर्यंत चांगला तापवून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यात तयार केलेली हिरवी पेस्ट टाका आणि तीला सुद्धा खरपूस परतून घ्या. पेस्ट परतून झाल्यावर त्यात खीमा टाका (खिमा पाण्याने स्वच्छ करून घ्यावा. एका कोरड्या कापडावर काढून त्यातील पाणी काढून टाकावे.) खीमा या हिरव्या वाटणामध्ये चांगला एकजीव करून घ्या. खिमा एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून त्याला १० मिनिटे वाफ काढा. १० मिनिटे वाफ काढून झाल्यावर त्यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाका. सोबत भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट टाका, बारीक चिरलेले टोमॅटो टाका ( भाजलेल्या सुक्या खोबऱ्या सोबत इतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत. ) सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्या. चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.  १५-२० मिनिटे याला वाफेवर शिजू द्या. (खिम्यामध्ये वेगळे पाणी टाकण्याची गरज नाही कारण खिमा शिजत असताना त्यातून आणि टोमॅटो मधून पाणी सुटते.) मध्ये मध्ये परतत रहा.  आता आपला खिमा पूर्णपणे तय्यार आहे. यावर बारीक काप केलेली कोथिंबीर टाकून सुंदर प्लेटिंग करून घ्या.  गरमागरम मटण खिमा भाकरी सोबत सर्व्ह करा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *