• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

kulichi bhaji ( fodshi ) – कूलीची भाजी ( रान भाजी )

साहित्य – १ ते २ जुड्या कूलीची भाजी ( या भाजीला फोडशी किंव्हा कुलू असं देखील नाव प्रचलित आहे.), २ tbl spn मुंग डाळ, २ ते ३ कांदे बारीक चिरलेले, ४ मिरच्या बारीक चिरलेल्या, २-३ tbl spn ओल्या नारळाचा खीस, १ tea spn हळद, १०-१२ कडीपत्त्याची पाने, १ tea spn हिंग, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ tbl spn, जिरे, १/२ tbl spn राई आणि चवीनुसार मीठ.
कूलीची भाजी (फोडशी) नेमकी दिसते कशी ते आपण पाहूया..

 

या भाजीला स्वच्छ धुवून पातीच्या कांद्यासारखी चिरून घ्या. 

कृती – सर्वप्रथम एका पॅन मध्ये ३ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. तेल गरम झाल्यावर यात राई-जिरे टाकावेत. राई-जिरे तडखायला सुरुवात झाल्यावर यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्त्याची पाने, हिंग टाकून घ्यावे. मिश्रण हलके परतून घ्या. आता यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा तांबूस रंगापर्यंत परतून घ्या. नंतर यात हळद टाका. सर्व मिश्रण परतून घ्या. मिश्रण परतून झाल्यावर यात मुगाची डाळ टाका. ( मुगाची डाळ अगोदर स्वच्छ धुवून ६० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. ) डाळ या मिश्रणात एकजीव करून घ्या. आता यात चिरलेली कूलीची (फोडशी) टाका. भाजी मिश्रणात एकजीव करून घ्या. २ मिनिटे परतून घ्या. भाजी मधले पाणी निघून हलकी मऊसर होईल. यात आता ओल्या नारळाचा खीस टाका. परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाका. पुन्हा भाजी परतून एकजीव करून घ्या. भाड्यावर झाकण ठेवून ५-१० मिनिटे भाजीला शिजवून घ्या. भाजी शिजल्यानंतर एका सुंदर भांड्यात काढून वर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम चपाती किंव्हा भाकरी सोबत सर्व्ह करा.

टीप – हि भाजी गवतासारखी दिसून येते आणि खासकरून पावसाळी दरम्यान बाजारात दाखल होते. इतर भाज्यांप्रमाणे हि भाजी चविष्ट तर असतेच पण या भाजीचा समावेश शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्हीमध्ये वापर केला जातो. रान भाजी असल्यामुळे बरीच माती आणि मुळांना चिख्खल असतो, त्यामुळे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *