• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

खाण्यापासून गाण्यापर्यंत कोळी समाजाची संस्कृती

जीभ चाळवणारी भरलेली पापलेट, खरपूस परतलेला ओला जवळा किंवा मटणाच्या झणझणीत रश्शासोबत तवाभर गरमागरम तांदळाची भाकरी, कोंबडी वडे, रावस किंवा सुरमईचे कालवण आणि पावसाळ्यात बोंबील … तोंडाला पाणी आणणाऱ्या अशा मांसाहाराची चव चाखायची असेल तर कोळी बांधवांकडचा पाहुणचार घ्यायलाच हवा.. कोळी बांधवांच्या लज्जतदार जेवणाचा आस्वाद देणारी अनेक हॉटेल्स आता आली असली तरी चुलीवर आणि हाताने थापलेल्या भाकरीसोबत झणझणीत कोळी खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा तर घरगुती जेवणाला पर्याय नाही.

ठाणे, ऐरोली, कल्याण, अलिबाग, रेवस, श्रीवर्धन, उरण आणि मुंबईत कुलाबा, कोळीवाडा, मढ, धारावी, खारदांडा, गिरगांव,वेसावा, मुलुंड,वसई, सातपाटी, पालघर हा परिसर म्हणजे कोळी बांधवांची वस्ती. समुद्रकिनाऱ्यालगतच वास्तव्य करणाऱ्या या समाजाला समुद्रातल्या या खजिन्याची चव उमगली. आजही खोल दर्यात जावून मासेमारी आणि मासे सुकवण्याचा व्यवसायही होतो. मत्साहार आणि मांसाहाराशिवाय कोळी जेवणाचा विचारच केला जाऊ शकत नाही. गोल गरगरीत भाकरीसोबत आलं, लसूण आणि तब्बल ५२ प्रकारच्या सिक्रेट मसाल्यांपासून बनवलेल्या आमच्या कोळी मसाल्याच्या मिश्रणात शिजवलेलं मटण तोंडात टाकण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही. कोळी बांधवांच्या प्रत्येक लग्नात हमखास ताटात दिसणारा पदार्थ म्हणजे नारळाचे वाटण असलेल्या भरल्या वांग्यातला खमंग जवळा. याखेरीज रुचकर पापलेट फ्राय, भरलेलं पापलेट, कोलंबीचं कालवण, फ्राय कोलंबी, कोलंबी भात, सुक्या बोंबलाची चटणी, शिंपले, कालवं हे पदार्थदेखील कोळी फूड कल्चरचा अविभाज्य भाग झालेत. काही माशांच्या कालवणात तर चक्क कच्च्या आंब्यांचा वापर केला जातो आणि चटपटीत एक वेगळी चव पुन्हा चाखायला मिळते.

शाकाहारी जेवणात कोळी बांधवांच्या नारळी भाताची सर कशालाच नाही. लसणाच्या तिखट चटणीबरोबर किंवा कधी चहासोबतही तांदळाची भाकरी आवडीने खाल्ली जाते. आजही संपूर्ण कोळीवाड्यात तांदळाची भाकरी हि अव्व्याहात पणे केली जाते. तशी उण्या भाकरी पेक्षा शिळ्या भाकरीला जरा जास्तच मान आहे. उणी म्हणजे शिळी… आजही घरी भाकरी बनली कि ५ भाकऱ्या जरा जास्तच जोमाने बनतात, अगदी खास करून उपवासाच्या वारा दिवशी. कारण दुसऱ्या दिवशी मस्त कोंबडी किंव्हा झणझणीत मटण, मासळी असली कि त्याच्या जोडीला चुलीवर किंव्हा गॅस वर भूजलेली तांदळाची भाकरी म्हणजे जीव कि प्राणच. तसा घरात कोणताही वार असला तरी तांदळाच्या भाकरीला प्रथम प्राधान्य आजही घराघरात आहे. गव्हाच्या चपात्या तशा थोड्या कमीच होतात म्हणा..

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *