
Jitadi fry – जिताडी (खाजरी) फ्राय
साहित्य – ३ हिरव्या मिरच्या, १०/१२ लसूण पाकळ्या, दिड इंच आले, मूठभर कोथिंबीर, २ tea spn हळद, सिक्रेट कोळी मसाला २ tbl spn, २ tbl spn लिंबाचा रस, कोटिंग करण्यासाठी तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ.
जिताडी म्हणजेच खाजरी मासा दिसतो कसा ते आपण पाहूया.
कृती – सर्व प्रथम जीताडी क्लीन करून त्यांचे तुकडे करून घ्यावे. आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घ्या. सर्व तुकडे एकत्र करून त्यावर हि हिरवी पेस्ट टाका सोबत हळद टाका, सिक्रेट कोळी मसाला टाका लिंबाचा रस टाका आणि चवीनुसार मीठ टाका. (टीप – आपण लिंबाच्या ऐवजी कोकम आगळ, चिंचेचा कोळ हे देखील वापरू शकता. ) सर्व जिन्नस एकत्र करून जिताडीच्या तुकड्यांना चांगले चोळून घ्या. सर्व तुकडे ३० मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्या. ( मॅरिनेशन करून फ्रीज मध्ये ठेवणार असाल तर मॅरिनेशनची वेळ संपल्यावर १५ ते २० मिनिटे खोलीच्या तापमानावर ठेवावे. (Room Tempreture) नाहीतर जिताडीचे तुकडे थंड असल्या कारणाने तव्याच्या बुडाला चिकटण्याची शक्यता असते. ) आता एका तव्यावर तळण्याकरिता तेल घ्या आणि चांगले तापवून घ्या. तांदळाच्या पिठात एक एक करून सर्व जिताडीचे तुकडे चांगले घोळून घ्या. आता गरम तेलात जिताडी दोन्ही बाजूने सोनेरी रंगापर्यंत तळून घ्या. (एका बाजूने ५ मिनिटे आणि दुसऱ्या बाजूने ५ मिनिटे अशी फ्राय करून घ्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा.) जिताडी दोन्ही बाजूने चांगली तळून झाल्यावर एका प्लेट मध्ये टिशू पेपरवर काढून घ्या. गरमागरम जिताडी फ्राय तय्यार !
There are no comments