• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Crab Rice – चिंबोरी भात

साहित्य – ६ ते ७ मध्यम खेकडे ( या रेसिपीला जास्त मोठे खेकडे घेऊ नयेत ) ४०० ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा खिस, २-३  बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ १/२ tbl spn आले लसणाची पेस्ट, ३ मोठे कांदे पात्तळ चिरलेले, ४ tbl spn चिंचेचा कोळ, अक्खा गरम मसाला – ३ हिरवी वेलची, १ मसाला वेलची, ६ ते ७ काळीमिरी, ५ ते ६ लवंग, ३ तेजपत्ता आणि अर्धा तुकडा दालचिनी, ३ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ, १ १/२ tea spn  हळद, ४ tbl spn बेसन ( सी फूड असल्यामुळे आणि त्यातल्यात्यात खेकडे असल्यामुळे दही येथे वापरू नये. दही केवळ मोजक्याच मासळींना जोडक आहे ), एक वाटी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.

कृती – सर्व प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून त्याला ३० मिनिटे भिऊन ठेवावा आणि त्यानंतर त्याचे पाणी वेगळे करून घ्यावे. आता हा तांदूळ आपल्याला ७०% पर्यंत शिजवून घ्यावा. सोबत त्यात अख्खा गरम मसाला टाका. एक tbl spn मीठ टाका. तांदूळ शिजल्या नंतर त्याला एका चाळणीच्या साहाय्याने वेगळे करून घ्यावे. आता एका कढईत किंव्हा पातेल्यात ४ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात कांदा टाकून सोनेरी रंगापर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यात आले लसणाची पेस्ट टाका. सीक्रेट कोळी मसाला टाका ( आपल्या सोयी नुसार तिखट कमी अधिक करू शकता ). हळद टाका. भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा खीस टाका. बारीक काप केलेल्या मिरच्या टाका. ४ tbl spn बेसन टाका. सर्व मसाले व्यवस्थित १ मिनिटापर्यंत परतून घ्या . मसाले परतून झाल्यावर त्यात खेकडे टायचे आहेत अर्थात चिंबोरी. खेकडे सर्व मसाल्यात चांगले मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर यात खेकड्यांच्या अर्क टाका. ( हा अर्क अगदी सोपा आहे. खेकडे साफ करताना त्यांच्या नांग्या वेगळ्या करून घ्या आणि त्यांना एका मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्या  आणि अर्क एका गाळणीने गाळून घ्या. खेकड्याच्या अर्क तय्यार. ) वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. आता सर्व मिश्रण पुन्हा  मिक्स करून घ्या. मिश्रण मिक्स करून झाल्यावर त्यात १ १/२ ग्लास साधे पाणी टाकायचे. पाण्याचा जास्त वापर आपल्याला येथे करायचा नाही आहे कारण हा रस्सा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे. आता चिंचेचा कोळ टाकून घ्या. चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव  करून घ्या. या रस्याला आपल्याला २० मिनिटे चांगले उकळून घ्यायचे आहे. रस्सा जाडसर दिसू लागला कि गॅस अगदी मंद आचेवर करून घ्या. शेवटी आपण जो ७०% पर्यंत शिजवलेला भात होता तो यावर हलक्या हाताने टाकायचा आहे. पुन्हा एकदा भातावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि १० मिनिटे बंद आचेवर वाफ द्या. १० मिनिटांनंतर एकाबाजूने हा भात काढून त्याची सुंदर प्लेटिंग करून घ्या. आपला गरमागरम चिंबोरीचा म्हणजेच खेकड्याच्या भात तय्यार आहे.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *