• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Besan Ladoo – बेसनचे लाडू

साहित्य : ५०० ग्रॅम चण्याची डाळ, सजविण्यासाठी काजू बदाम आणि मणूके, २० ग्रॅम डिंक, ३५० ग्रॅम तूप, २२५ ग्रॅम पीठी साखर, ५० ग्रॅम बारीक रवा, २ tbl spn दूध, १/२ tea spn जायफळ पावडर आणि १/२ tbl spn हिरवी वेलची पावडर.

कृती : सर्वप्रथम चण्याची डाळ तांबूस रंगापर्यंत खरपूस भाजून घ्यावी. डाळ भाजून झाल्यावर तीला जाडसर दरदरीत दळून घ्यावी. आता कढईत २ tbl spn तूप टाकून तापवून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवावा. तूप तापल्यावर त्यात डिंक टाका. परतून घ्या. डिंक फुलून आल्यावर त्याला एका प्लेट मध्ये काढून घ्या. कढईतल्या तूपात १/२ tbl spn तूप अजून वाढवावे आणि त्यात रवा तांबूस रंगापर्यंत परतावा. रवा परतून झाल्यानंतर त्याला एका परातीत काढावा. आता उरलेले सर्व तूप कढईत टाकून तापवून घ्या. त्यात दळून घेतलेले चण्याचे पीठ टाका. तूप पिठात एकजीव करा. एकजीव झाल्यानंतर चण्याच्या पिठाला सतत ३०-३५ मिनिटे मंद आचेवर परतत राहा. पीठ तुपात परतून झाल्यानंतर त्यात वरून दूध शिंपडून घ्या. पुन्हा पीठ एकजीव करून घ्या. दूध शिंपडल्याने पीठ चांगले फुलून आलेलं असेल. आता पिठाला परातीत काढून घ्या. पीठ कोमट होईपर्यंत थंड करून घ्या. पीठ कोमट झाल्यानंतर यात पीठी साखर चाळणीने किंव्हा तळ हातावर थोडी मसळून टाका. आता यात जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकून घ्या. सुरुवातीला डिंक तळले होते ते सुद्धा आता यात मिक्स करून घ्या. चण्याच्या पिठात सर्व पदार्थ एकजीव करून त्याचे मध्यम गोल आकारात लाडू वळवून घ्या. लाडुवांवर काजू, बदाम आणि मणुके लावून सजवून घ्या किंव्हा तुमच्या आवडीनुसार ईतर कोणतेही ड्रायफ्रूट्स यांवर लावून सजवू शकता. सुंदर प्लेट मध्ये काढून लाडू सर्व्ह करावे.

टीप – लाडू वाळवताना जर पीठ अगदीच घट्ट झाले असेल तर परातीसहित गॅस वर १० /१५ सेकंद मोठ्या आचेवर खालून तापवून घ्या आणि लगेच बाजूला करा. पिठातले तूप पून्हा वितळायला सुरुवात होईल आणि लाडू देखील सहज वळवता येतील.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *