• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

baby shrimp patties – ओल्या जवल्याच्या वड्या

साहित्य – एक मोठी वाटी ओला जवला (५०० ग्रॅम ), ३ tbl spn तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ,१ tbl spn आले लसणाची पेस्ट, १/२ tea spn हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, २ पात्तळ चिरलेले कांदे कांदे, २ tbl spn ओरीजीनल सिक्रेट कोळी मसाला, तळण्याकरिता तेल.

कृती – वड्यांच्या मिश्रणासाठी एका भांड्यात पात्तळ चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिर्ची, आले लसणाची पेस्ट, हळद, ओरिजीनल सिक्रेट कोळी मसाला आणि तांदळाचे पीठ टाकून घ्या. (तांदळाच्या पिठा ऐवजी बेसन देखील वापरू शकता. वाड्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाच्या पिठाचा समावेश केला आहे. ) आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. संपूर्ण मिश्रण चांगले एक जीवकरून घ्या.  मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यात ओला जवला टाकायचा आहे. (ओला जवला सर्वात शेवटी हलक्या हाताने मिक्स करून घ्या, कारण ओला जवला नाजूक असल्यामुळे तो खळुन जाईल.) यात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा संपूर्ण मिश्रण अलगद हातानी एकजीव करायचे. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर साधारण आपल्याला गोल आकाराच्या वड्या बनवायच्या आहेत. एका पॅन मध्ये  तेल टाकून चांगले तापवून घ्यायचे आणि यात आपल्या एक एक करून जवल्याच्या वड्या तळण्याकरिता सोडा. या वड्या किमान ५ मिनिटे मंद आचेवर खरपूस दोन्ही बाजूने तळून घ्या.  आता आपल्या जवल्याच्या वड्या दोन्ही बाजूने चांगल्या तळून झाल्यावर  प्लेट मध्ये काढून गरमागरम सर्व्ह करायच्या.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *