• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

रताळ्याची खीर

साहित्य :- १ लिटर दूध, २५० ग्रॅम खिसलेले रताळे, अर्धी वाटी आवडते ड्रायफ्रूट्स, अर्धा चमचा व्हेनिला इसेंस, एक छोटा चमचा वेलची पूड, १०० ग्रॅम साजूक तूप, एक चमचा साबुदाणे, अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे, १५० ग्रॅम साखर.

कृती :- सर्व प्रथम एका पातेल्यात दूध घ्या. दूध चांगले उकळून घ्या. आता एका कढईत साजूक तूप टाका आणि त्याला गरम होऊ द्या. तूप चांगले गरम झाल्यावर त्यात किसलेले रताळे टाका. रताळ्याचा खीस तुपात हलका लालसर रंगापर्यंत मंद आचेवर परतून घ्या. आता यात ओल्या नारळाचा खीस टाका. नारळाचा खीस मिश्रणात चांगला घोळून घ्या. नारळाचा खीस मिश्रणात घोळून झाल्यावर त्यात वेलचीपूड टाका. सोबत ड्रायफ्रूट्स टाका. सर्व मिश्रण आता चांगले परतून घ्या. मिश्रण चांगले परतून झाल्यावर त्यात साखर टाका. साखर मिश्रणात विरघळेपर्यंत मिश्रण पुन्हा परतून घ्या. आता पाहू शकता आपण कि साखर विरघळून मिश्रण थोडे घट्ट झाले आहे. आता यात उकळलेले दूध टाका. मिश्रण दुधात घोळून घ्या. अर्धा चमचा यात व्हेनिला इसेंस टाका. इसेंस मिश्रणात मिक्स करून घ्या. आता यात एक चमचा साबुदाणे टाका. सर्व मिश्रण पुन्हा घोळून घ्या. आता दूध साबुदाणे शिजेपर्यंत मध्यम आचेवर

चांगले उकळून घ्या. १५ मिनिटांनी गॅस बंद करा आणि गरमागरम ” रताळ्याची खीर ” वाढून घ्या.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *