• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

कलेजी फ्राय

साहित्य – १ किलो बकर्याची कलेजी, २ चमचे आले लसणाची पेस्ट, ३ बारीक चिरलेले कांदे, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, २ पात्तळ चिरलेल्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १५ ते २० पुदिन्याची पाने, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, १ चमचा हळद , चवीनुसार मीठ आणि ४ चमचे तेल.

कृती – प्रथम एका तव्यावर तेल गरम करून त्यात २ पात्तळ चिरलेल्या मिरच्या आणि आले लसणाच्या पेस्ट ची फोडणी द्यावी व सोबत थोडी कोथिंबीर फोडणीत टाकावी. पेस्ट लालसर झाल्यावर त्यात कांदा देखील सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावा. कांदा टाळून झाल्यावर त्यात कलेजी टाकावी व ५ मिनिटे कांदा आणि लसणाच्या फोडणीत शिजवून घ्यावी. ५ मिनिटानंतर त्यात ४ चमचे चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, १ चमचा हळद टाकावी. सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे आणि झाकण ठेवून वाफेवर किमान १० मिनिटे शिजवून घ्यावे. १० मिनिटानंतर यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर , पुदिन्याची पाने आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा १० मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. शिजत असताना मध्ये मध्ये सर्व मिश्रण परतून घ्यावे. गरमागरम कलेजी एका छान वाटीत काढून तिला तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करावी.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *