
सुक्या ‘वाक्ट्याची चीचवणी’
साहित्य – ५ ते ६ वाकटयांचे ३-३ तुकडे करून घ्यायचे,अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, साधारण एक इंच आलं, ४ ते ५ लसुन पाकळी, ४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर यांचे वाटण, ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ आणि ३ मोठे चमचे तेल .
कृती – सर्व वाक्ट्या एका कोमट पाण्यात साधारण १० मिनिटे भिजवाव्यात. कोमट पाण्यात भिजवल्याने त्यावरची धूळ निघून जाते आणि मऊ देखील होतात. आता एका मोठ्या वाडग्यात चिंचेचा कोळ घ्यायचा. याच चिंचेच्या रसात आपल्या सर्व वाक्ट्या टाकाव्यात आणि चांगल्या मिक्स करून घ्याव्यात. एका पातेल्यात ३ चमचे तेल गरम करून तयार हिरवं वाटण यात टाकावं. वाटण टाकल्यावर त्यात एक चमचा हळद टाकावी. नंतर ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा आणि सर्व मिश्रण चांगले तेलात परतून घ्यायचे आणि एक ताव काढायचा. आपल्या सर्व वाक्ट्या आणि चिंचेचे पाणी यात टाकायचे आहे. सर्व मिश्रण आता चांगले परतून घ्या. नंतर अर्धी वाटी पाणी टाकावे. आपण नंतर देखील पाणी टाकणार आहोत म्हणून अगोदर थोडेच घ्यावे. आता एका मोठ्या वाटीत अर्धी छोटी वाटी ( साधारण ४ चमचे ) तांदळाचे पीठ घेऊन त्यात ३ वाटी पाणी टाकून घोळून घ्या. पीठ चांगले घोळून झाल्यावर या आंबटात टाकावे. सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावेत. साधारण या रस्याला थोड्या वेळानी जाडसर तर्री आलेली दिसेल. आता यात आपल्या चवी नुसार मीठ टाकावे. नंतर मिश्रणाला चांगली उकळी काढावी. उकळी निघाल्यावर साधारण ८ मिनिटांनी आपला ग्यास बंद करावा. कोळी समाजात प्रसिध्द असलेली गरमागरम आंबट, रसरशीत आणि झणझणीत ‘वाक्ट्याची चीचवणी’ तयार आहे.
There are no comments