
गटारी स्पेशल तिखटदार गावठी कोंबडी रस्सा
साहित्य – एक किलो गावठी कोंबडी, २ चमचे आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, १ पात्तळ चिरलेला कांदा, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ५ चमचे चमचा ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि ४ मोठे चमचे तेल .
कृती – सर्व प्रथम एका तव्यात १ चमचा तेल गरम करून त्यात कांदा ७०% पर्यंत तांबूस करून घ्यावा. नंतर सुक्या खोबर्याचा खीस हा देखील खरपूस भाजून घ्यावा. आता आपल्याला कांदा आणि खोबर्याचे एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे. वाटण तयार झाल्यावर एका मोठ्या पातेल्यात ४ मोठे चमचे तेल गरम करून त्यात २ चमचे आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी आणि एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचा. पेस्ट परतून झाल्यावर त्यात गावठी कोंबडी शिजण्याकरिता टाकावी. कोंबडीचे तुकडे त्यात चांगले परतून घ्यायचे. आले लसणाच्या पेस्टमध्ये कोंबडी चांगली परतून झाल्यावर त्यात एक चमचा हळद आणि ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. आता संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर किमान १० मिनिटे वाफ काढावी ( गावठी कोंबडीला शिजण्याकरिता जास्त वेळ लागतो. ) १० मिनिटानंतर मासाल्यातून लालसर ताव सुटलेला दिसेल. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून पुन्हा १० मिनिटे पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी. १० मिनिटे झाल्यावर सर्व मिश्रण एकजीव करायचे आणि रस्स्यासाठी ३ ग्लास कोमट पाणी टाकावे ( यात थंड पाण्याचा वापर टाळावा ). पाणी टाकल्यावर मिश्रण चांगले घोळून घ्यावे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून झाकण उघडे ठेवून १० मिनिटे हा रस्सा मध्यम आचेवर चांगला उकळू द्यावा. १० मिनिटानंतर ग्यास बंद करून सुंदर बाउल मध्ये तयार तिखटदार गावठी कोंबडीचा रस्सा सर्व्ह करावा.
Best love it