• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Stuffed pomfret – कोळी स्पेशल भरलेलं पापलेट

साहित्य – एक मोठं पापलेट, खीसलेलं ओलं खोबरं, ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक छोटा चमचा हळद, ( आले, लसुन, मिर्ची आणि कोथिंबीरची पेस्ट ) १ चमचा भाजलेल्या सुख्या खोबर्याचा कूट, कोकम आगळ, नारळाचे पाणी,चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता २ चमचे तेल.

कृती – प्रथम पापलेटला पोटाकडील भागाला कर्व्ह असलेल्या सुरीने चीर पाडावी. कर्व्ह असलेली सुरी नसेल तर आपल्या जवळच्या कोळीण मावशी जवळून अशी दाखवल्या प्रमाणे चीर पाडावी. काहीच अगदी समजले नाही तर कोळीण मावशीला म्हणावं कि पापलेट भरायचे आहेत. पापलेट घेताना शेपटी आणि पर कापायचे नाही. अख्खा पापलेट दिसायला सुंदर दिसतो. आता पापलेटवर चिमुटभर हळद टाकावी. २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा, एक चमचा कोकम आगळ टाकायचे, आले, लसुन, मिर्ची आणि कोथिंबीरची पेस्ट साधारण दीड चमचा टाकायची, आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मसाले पापलेटला मस्त आतून भाहेरून चोळून घ्यायचे. मिश्रण चीर पाडलेल्या भागात सुद्धा आत पर्यंत चोळावे. आता पापलेटला किमान ३० मिनिटे म्यारीनेट (मुरण्यासाठी) ठेवावे. पापलेट जो पर्यंत मुरतंय त्या वेळेत आपण पापलेटसाठी लागणारी स्टफिंग बनवून घेवूया. साधारण २ छोटे चमचे तेल कढईत टाकून गरम करावे. तेल तापल्यावर यात उरलेली आपली हिरवी पेस्ट साधारण २ चमचे टाकायची आणि तेलात परतून घ्यावी. नंतर तेलात चिमुटभर हळद आणि एक चमचा ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. सर्व मसाले एकत्रीत परतून घ्यावे. मसाले परतून झाल्यावर त्यात ओल्या नारळाचा खीस २ चमचे आणि भाजलेल्या सुख्या खोबर्याचा कूट टाकावा २ चमचे टाकावा आणि तेलात चांगला परतून घ्यावा. मला इथे आवर्जून एक सांगावेसे वाटते कि आपण येथे ओल्या आणि सुख्या खोबऱ्याची थोडे पाणी टाकून पेस्ट देखील वापरू शकता. पण खोबर्याचा चमचमीत खीस जेव्हा खाताना दाताखाली येतो तेव्हा जाम भारी वाटते. म्हणून मी इथे खीस वापरलेला आहे. सर्व मिश्रण परतून झाल्यावर साधारण एक चमचा कोकम आगळ, चवीनुसार मीठआणि नारळाचे पाणी टाकावे. नारळाच्या पाणीचे गुपित सांगतो. बरेच जण मसाले व्यवस्थित ब्लेंड ( एकजीव ) होण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. पण मी इथे त्यात एक्स्ट्रा टेस्ट येण्या करिता नारळाच्या पाण्याचे वापर केले आहे. आपल्याजवळ जर अगदीच नसेल नारळाचे पाणी तर साध्या पाण्याचा देखील वापर करू शकता. आता सर्व मसाले मिक्स करून घ्यावे आणि २ मिनिटे पुन्हा भाजावे, जेणे करून आपले सर्व मसाल्यांची चव यात व्यवस्थित मिक्स होईल. तयार झालेली स्टफिंग (आत भरायचे सारण ) एका मोठ्या वाटीत काढून थोडं थंड होऊ द्या. आपला पापलेट देखील आता मसाल्यात चांगलाच मुरला आहे. पापलेटला चीर पाडलेल्या भागात तयार सारण आत भरून घ्यावे. आत भरताना सर्व सारण व्यवस्थित पसरून घ्यावे. मिश्रण बाहेर न येण्यासाठी पापलेटला धाघ्यानी बांधून घ्या. आता एका तव्यावर २ चमचे तेल गरम करावे. या तेलात आपला पापलेट ५ मिनिटे तळण्याकरिता सोडवा. तळताना ग्यास मंद आचेवर ठेवून तळावे. आता दुसरी बाजू तळून घ्यावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगासारख्या खरपूस भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून त्याची प्लेटिंग करून घ्यावी. मस्त कोळी स्पेशल भरलेलं पापलेट तयार आहे.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *