कुरकुरीत बोंबील फ्राय
साहित्य – ४ ते ५ ओले बोंबील, कोथिंबीर, ७ ते ८ लसूण पाकळ्या आणि ५ ते ६ छोट्या आल्याच्या फोडी, एक चमचा लेमन जेस्ट, ३ हिरव्या मिरच्या, हळद , ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, कोकम आगळ, तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.
कृती – सर्वप्रथम बोंबील स्वच्छ धुवून त्याला मधून चीर पाडून घ्यावी. आता बोंबलाच्या आतला मणका काढून टाकायचा, सर्व बोंबील एका टिशू पेपरने किंव्हा सुक्या कपड्याने निपटून कोरडे करावे, नंतर बोंबिलवर पसरट ताट ठेवून त्यावर किमान ३० ते ३५ मिनिटे वजनदार कोणतेही भांडे किंव्हा पाटा ठेवायचा. असे केल्याने बोंबील मधले सर्व पाणी निघून ते पात्तळ आणि अधिक कोरडे होतील व खाण्यास कुरकुरीतपणा येईल. आता आपले बोंबील कोरडे झाले आहेत आणि वजनदार भांडे ठेवल्याने त्यातले सर्व पाणी निघून गेले आहे. नंतर एक बाजूला आले, लसूण, कोथिंबीर आणि मिरची यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. पेस्ट तयार झाल्यावर बोंबलावर एक चमचा कोकम आगळ टाकायचे, एक चमचा हळद टाकायची, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. जर बोंबील चे प्रमाण जास्त असेल त्या नुसार कोळी मसाला वाढवून घ्यावा. तयार हिरवी पेस्ट २ चमचे टाकायची. एक चमचा लेमन जेस्ट टाकायचे. लेमन जेस्ट ने एक सुंदर फ्लेव्हर मिळतो. चवीनुसार मीठ टाकायचे. आता सर्व मसाले एकत्रित करून सर्व बोंबीलला व्यवस्थित चोळून घ्यावे. मसाले व्यवस्थित चोळून झाल्यावर किमान १५ मिनिटे मुरवून ठेवावे. आता एक प्लेट मध्ये तांदळाचे पीठ पसरवून घावे, बोंबील दोन्ही बाजूने तांदळाच्या पिठात चांगला घोळून घ्यावा, आता एका पॅन मध्ये ४ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे, आता फडफडत्या तेलात बोंबील फ्राय करण्यासाठी सोडावे, लक्षात असुद्या की बोंबील तळताना गॅस ची फ्लेम मंद असावी. ५ ते ८ मिनिटांनी बोंबील दुसऱ्या बाजूने चांगला शेकवून घ्यावा. अशा प्रकारे बोंबील दोन्ही बाजूने सोनेरी रंगासारखा खरपूस तळून घ्यावा. बोंबील तळून झाल्यावर तयार आहे झणझणीत आणि खाण्यास अगदी कुरकुरीत असे कोळीवाड्यातले स्पेशल बोंबील फ्राय. कुरकुरीत बोंबील आपण भाकरी सोबत किंव्हा असेच स्टाटर्स म्हणून एन्जॉय करू शकता.

There are no comments