• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Stuffed Crab Curry – पीठाने भरलेले खेकडे

साहित्य – ६ ते ७ मध्यम आकाराचे खेकडे, एक वाटी कोथिंबीर, ३ मिरच्या, २ इंच आले, १५-१६ लसूण पाकळ्या, ४ tbl spn सिक्रेट कोळी मसाला, १ १/२ tbl spn हळद, ३ बारीक काप केलेले कांदे, २५० ग्रॅम चण्याचे पीठ, २ tbl spn लिंबाचा रस, ४ ते ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या ( फोडणीसाठी ), एक मोठी वाटी खेकड्याच्या अर्क, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, एक वाटी भाजलेले सुखे खोबरे, खेकडे बांधण्यासाठी धागे, चवीनुसार मीठ.

कृती – सर्व प्रथम खेकडे आतून आणि बाहेरून साफ करून घ्या. एका कढईत साधारण २ चमचे तेल टाकून चांगले गरम करून घ्या, तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकून तांबूस रंगापर्यंत परतवून घ्या. कांदा परतवून झाल्यावर त्यात २ tbl spn हिरवी पेस्ट टाका.( हिरव्या पेस्ट मध्ये कोथिंबीर, आले लसूण आणि मिरची वापरण्यात आली आहे. ) अर्धा tbl spn सिक्रेट कोळी मसाला टाका, अर्धा tea spn हळद टाका आणि भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे कूट टाका ( भाजलेले सुके खोबरे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले आहे. ) आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण एकजीव करून झाल्यावर त्यात चण्याचे पीठ टाकून घ्या आणि खरपूस भाजून घ्या. हलकं चिमूटभर मीठ देखील टाकून घ्या आणि सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. सारण तयार झाल्यावर त्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्या. सारण थंड झाल्यावर त्यात अगदी हलके पाणी शिंपडून मळून घ्या. आता तयार सारणाचा छोटा गोळा करून खेकड्यांच्या डोक्याच्या पातीकडील बाजूस गच्च भरून दोन्ही बाजू बंद करून घ्या. सर्व खेकडे स्टफ करून झाल्यावर त्यांना एका प्लेट मध्ये काढून घ्या. ( सारण उरले असेल तर ते फेकू नका कारण त्या सारणाचा वापर रस्स्यासाठी देखील आपण करू शकतो. ) आता एका धाग्याच्या सहाय्याने खेकड्याला बांधून घ्या. एका कढईत ४ tbl spn तेल टाकून तापवून घ्या आणि त्यात ठेचलेला लसूण फोडणीसाठी टाका. उरलेली तयार हिरवी पेस्ट टाका आणि चांगली परतवून घ्या. आता यात ४ tbl spn सिक्रेट कोळी मसाला टाका आणि सोबत एक tea spn हळद, २ tbl spn भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कूट टाकून चांगले तेल सुटे पर्यंत सर्व मिश्रण भाजून घ्या. उरलेले सारण आता यात आपण वापरणार आहोत म्हणजे आपल्या रस्याला देखील मस्त सुगंध हि येईल आणि रस्सा आपला हलका जाडसर हि होईल. मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर यात खेकड्याच्या अर्क टाकून घ्या आणि रस्सा चांगला एकजीव करून घ्या. स्टफ केलेले सर्व खेकडे यात एक एक करून शिजण्यासाठी सोडा. रस्याला पहिली उकळी आल्यावर यात चिंचेचा कोळ टाका. चवीनुसार मीठ टाका आणि चांगले मिक्स करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. वर झाकण ठेवून किमान १५ मिनिटे वाफेवर खेकडे शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा आणि तांदळाच्या भाकरी सोबत किंव्हा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *