
Salt and paper chana fry – चटपटीत मीरी चणे
साहित्य – २५० ग्रॅम काबुली चणे, १ १/२ tbl spn क्रश आले, १ १/२ tbl spn क्रश लसूण, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धी वाटी कोथिंबीर, १/२ लिंबाची फोड, १ कांदा बारीक चिरलेला, १/२ १ tbl spn शेंध मीठ ( काळे मीठ ), १ १/२ १ tbl spn क्रश केलेली काळीमीरी, १/२ १ tbl spn आमचूर पावडर, चणे कोटिंगकरण्यासाठी आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ, १/२ tea spn हळद आणि चवीनुसार मीठ.
कृती – काबुली चणे रात्रभर भिजवून ठेवावे. नंतर कुकरला चण्यात मीठ टाकून ३ शिट्या घेऊन उकडून घ्यावे. चणे चाळणीने पाणी काढून कोरडे करून घ्यावे. एका प्लेटमध्ये चणे घेऊन त्यावर तांदळाचे पीठ चोळावे. हे चणे आता उकळत्या तेलात तळून हलके सोनेरी करावे. चणे टिशू पेपरवर काढावे. पॅनमध्ये ३ tbl spn तेल टाकून तापवावे आणि त्यात आले, लसूण आणि मिर्ची टाकून परतून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात कांदा टाकून तांबूस परतावा. कांदा तांबूस परतल्यानंतर त्यात कोथिंबीर, हळद, शेंध मीठ, काळीमीरी पूड, आमचूर पावडर टाकावी आणि पुन्हा सर्व मिश्रण परतून घ्यावे. आता यात जे फ्राय केलेले चणे आहेत ते टाकावे आणि सोबत लिंबू त्यात पिळून घ्यावा, चवीनुसार मीठ टाकावे. ( चणे उकडताना त्यात मीठ वापरल्याने आता यात मीठ सांभाळून टाकावे. ) शेवटी पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि मिश्रण परतून घ्यावे. गरमागरम चटपटीत मीरी चणे सर्व्ह करावे.
There are no comments