• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

pomfret tawa fry – पापलेट तवा फ्राय

साहित्य – एक अख्खा पापलेट, अर्धा इंच आले, ४ लसुन पाकळ्या, १ मोठी हिरवी मिरची, कोथिंबीर, एक वाटी तांदळाचे पीठ, १ tbl spn कोकम आगळ, १ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, १ tea spn हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.

कृती – सर्व प्रथम पापलेटला दोन्ही बाजूने चिरा पाडून घ्याव्यात, जेणेकरून आपला सर्व मसाला व्यवस्थित आतपर्यंत जाईल. आता अर्धा इंच आले, ४ लसुन पाकळ्या, १ मोठी हिरवी मिरची, कोथिंबीर सर्वांची बारीक पेस्ट करून घ्यावी. पेस्ट तयार झाल्यावर पापलेट वर कोकम आगळ, ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, हळद, १ tbl spn तयार झालेली हिरवी पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस पापलेटला दोन्ही बाजूने व्यवस्थित चोळून घ्यावे आणि पापलेट आता किमान ३० मिनिटे मुरण्यासाठी ठेवावा. ३० मिनिटे झाल्यावर एका मोठ्या थाळीत तांदळाचे पीठ टाकून पापलेट दोन्ही बाजूने तांदळाच्या पीठाने कोट करून घ्यावा. एका तव्यावर तेल गरम करून घ्यावे आणि तेल गरम झाल्यावर त्यात पापलेट तळण्याकरिता सोडावा. ५ मिनिटे एका बाजूने व ५ मिनिटे दुसऱ्या बाजूने असा लालसर रंग आल्यावर पापलेट पूर्णपणे तयार झालेला असेल. एका टिशू पेपरवर काढून अधिक तेल काढून घ्यावे आणि सुंदर प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करावा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *