• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Poha chivda – पात्तळ पोह्याचा चिवडा

साहित्य – २५० ग्रॅम पात्तळ पोहे, ४ हिरव्या मिरच्या, २० कडीपत्त्याची पाने, १ tbl spn पीठी साखर, सोयीनुसार काजू आणि मणूके, ३ tbl spn चण्याच्या डाळ्या, ५० ग्रॅम उभे काप केलेलं सुके खोबरे, ५० ग्रॅम कच्चे शेंगदाणे, १ tbl spn धणे, १ tbl spn बडीशेप, १ १/२ tbl spn खसखस, १/२ tea spn हिंग, १ १/२ tea spn हळद आणि चवीनुसार मीठ.

कृती – पोहे एका कोरड्या कपड्यावर पसरवून २ दिवस उन्हात चांगले वाळवून घ्या. एका कढईत हे पोहे तेल न टाकता हलके भाजून घ्या. आता  ३ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. त्यात  चण्याच्या डाळ्या, काजू, कच्चे शेंगदाणे आणि सुके खोबरे तळून घ्या (एकत्र तळू नये). आता त्याच तेलात २ tbl spn तेल वाढवून गरम करून घ्या. तेल तापल्यावर त्यात फोडणीसाठी मिरच्या, कडीपत्त्याची पाने, धणे, बडीशेप, खसखस ( खसखस फोडणीत सुरुवातीला थोडीच टाका. ), हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले परतून घ्या. फोडणी चांगली परतून झाल्यावर छान सुगंध सुटेल तेव्हा त्यात उरलेली खसखस टाका आणि पुन्हा परतून घ्या. आता यात भाजलेले पोहे टाका आणि फोडणीत चांगले मिक्स करून घ्या. पोहे मिक्स झाल्यावर एका परातीत काढून घ्या. आता यात तळलेले चण्याच्या डाळ्या, काजू, कच्चे शेंगदाणे आणि सुके खोबरे वरून टाका आणि सोबत मनुके टाका. चिवडा थंड होऊ द्या. चिवडा थंड झाल्यावर त्यावर पिठीसाखर टाका आणि संपूर्ण चिवडा चांगला मिक्स करून घ्या. पोह्याचा कुरकुरीत चिवडा तय्यार !

टीप : हा चिवडा हवाबंद बरणीत ठेवा म्हणजे या चिवड्याचा कुरकुरीत आस्वाद आपण अधिकाधिक घेऊ शकतो.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *