• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

narali bhat – नारळी भात

साहित्य – २५० ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी (५० ग्रॅम) साजूक तुप, एक वाटी (१००ग्रॅम) खिसलेले ओले खोबरे, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, २ तमालपत्र, ४-५ लवंग, १ तुकडा डालचिनी, ४-५ हिरवी वेलची (जायफळ पर्यायी), अर्धा चमचा केसर किंव्हा केसर इसेन्स, एक वाटी (५० मी. ली.)  नारळाचे दूध, ३ ते ४ थेंब लेमन फूड कलर, ५० ग्रॅम गूळ (आपल्या गोडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता), १ tea spn मीठ.

कृती – सर्वप्रथम बासमती तांदूळ २ तास अगोदर पाण्यात भिजवत ठेवावा आणि त्यानंतर त्यातले  पाणी गाळून तांदूळ वेगळा करावा. आता एका पातेल्यात २ चमचे साजूक तुप घेऊन चांगले गरम करावे आणि त्यात लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र टाकावे व थोडे तडकू द्यावे. मसाले तडकल्यावर त्यात भिजवलेला बासमती तांदूळ टाकावा. बासमती तांदूळ मसाल्यासोबत परतून घ्यावा. आता यात साधारण ४ वाटी कोमट पाणी टाकून ६०% पर्यंत शिजवून घ्यावा. भाताला उकळी आल्यावर साधारण ६०% पर्यंत शिजला आहे कि नाही हे तपासून घ्यावे, जर ६०% पर्यंत शिजला असेल तर एका चाळणीच्या साहाय्याने त्याला वेगळे करून घ्यावे. एका कढईत किंव्हा पातेल्यात आता ४ चमचे साजूक तूप घेऊन गरम करावे. तुप गरम झाल्यावर त्यात वेलची ठेचून टाकावी ( यात आपण वेलची पूड देखील वापरू शकता ) त्या नंतर यात एक वाटी खिसलेले ओले खोबरे टाकावे आणि ते सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यावे. खोबरे सोनेरी रंगा सारखे दिसू लागल्यावर त्यात अर्धी वाटी गुळ टाकावे ( गुळ टाकताना त्याचे काप करून किंव्हा खिसून टाकावे म्हणजे ते लवकर विरघळून जाईल ). गॅस मंद आचेवर ठेवावा. खोबऱ्याच्या मिश्रणात गुळ विरघळून गेल्यावर त्यात आपले आवडते ड्रायफ्रूट्स टाकावे. नारळाचे दूध टाकावे. फूड कलर टाकावा. ( फूड कलर पर्यायी आहे. जर पसंत नसल्यास टाळला तरी चालेल.) अर्धा चमचा केसर इसेन्स टाकावा. सर्व मिश्रण एकजीव करून सर्व जिन्नस थोडं मंद आचेवर आटवून द्यावा. आता यात अर्धा छोटा चमचा मीठ टाकावे. यात जर २५० ग्रॅम बासमती तांदूळ आणि वरील सर्व साहित्यांचे प्रमाण लक्षात घेता मिठाचे प्रमाण फक्त १ tea spn वापरावे. वरून आता ६०% पर्यंत शिजवलेला बासमती तांदूळ टाकावा. नारळाच्या मिश्रणात भात एकजीव करून घ्यावा. नारळाच्या मिश्रणात भात एकजीव करून घ्यावा.  भात पूर्णपणे एकजीव झाल्यावर थोडे  कोमट पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून उरलेला ४०% पूर्णपाने १००% पर्यंत मंद आचेवर चांगला वाफेवर शिजवून घ्यावा. ५ ते १० मिनिटांच्या आत मध्ये-मध्ये हलक्या हाताने भात परतून घ्यावा. भात शिजल्यावर त्याला केळीच्या पानावर काढून आपल्या आवडीनुसार सजवून घ्यावा. या नारळी भाताचा आस्वाद गरमागरम असतानाच घ्यावा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *