
Masala Omelette – मसाला ऑमलेट
मसाला ऑमलेट
साहित्य – ४/५ अंडी, ४ बारीक चिरलेले कांदे, ½ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ टोमॅटो बारीक चिरलेले, १ tblsp काळीमीरी पावडर, १ tsp हळद, २½ tblsp सिक्रेट कोळी मसाला, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती – पॅनमध्ये ६ tblsp तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावा. कांदा परतून झाल्यानंतर यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, टोमॅटो बारीक चिरलेले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व मिश्रण परतून घ्यावे. परतून झाल्यावर यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाकावा. मसाला यात चांगला परतावा. परतून झाल्यावर सर्व मिश्रण पॅनमध्ये चांगले पसरून घ्यावे. आता एक एक करून सर्व अंडी यात सुटसुटीत फोडून घालावी. अंड्यांवरून काळीमीरी पावडर स्प्रिंकल करावी. मीठ देखील शिंपडावे. ( हवं असल्यास कांदा टोमॅटोच्या मिश्रणात देखील मीठ घालू शकता. ) वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मंद आचेवर वर झाकण ठेवून १०/१५ मिनिटे वाफेवर शिजवून गरमागरम मसाला ऑम्लेट सर्व करावा.
There are no comments