• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Lobster Curry – शिवंडीचा रस्सा

साहित्य – २ चमचे आले लसूण पेस्ट, ३ बारीक कापलेले कांदे, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, एक वाटी कोथिंबीर, एक चमचा हळद, ३ ते ४ tbl spn सिक्रेट कोळी मसाला, एक वाटी भाजलेला सुकं खोबरं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २५० मीली. ओल्या नारळाचे दूध, चवीनुसार मीठ.

कृती – एक वाटी कोथिंबीर, एक वाटी भाजलेला सुकं खोबरं, २ ते ३ हिरव्या मिरच्या घेऊन सर्व बारीक वाटून हिरवं वाटण तयार करून घ्या. सर्व लॉबस्टर क्लीन करून त्यात पाणी टाकून उकडवून घ्या. लॉबस्टर ( शिवंडी ) उकडून झाल्यावर त्यांना एका भांड्यात काढून घ्या. सर्वप्रथम एका कढईत किंव्हा पातेल्यात ४ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात कांदा लालसर रंगापर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतवून झाल्यावर त्यात आले लसणाची पेस्ट टाकून खरपूस भाजून घ्या. आले लसूण परतून झाल्यावर त्यात सिक्रेट कोळी मसाला टाका. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मसाल्याचे प्रमाण आपल्या सोयी नुसार कमी अधिक करू शकता. १ टी स्पून हळद टाका. आता आपले तयार हिरवं वाटण टाकून घ्या. सर्व मिश्रणाला तेल सुटे पर्यंत सतत परतत राहायचे. आपल्या मिश्रणाला तेल दिसू लागल्यावर यात एक एक करून सर्व लॉबस्टर त्यात टाकून घ्या. सर्व लॉबस्टर मसाल्यात चांगले मिक्स करून घ्या. लॉबस्टर मसाल्यात घोळून झाल्यावर त्यात ओल्या नारळाचे दूध टाका. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. चिंचेचा कोळ टाका. चवीनुसार मीठ टाका आणि सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्या. जेणेकरून आपले सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होतील. आता यात रस्स्यासाठी साधे पाणी टाका. ( सर्व लॉबस्टर त्या रस्स्यात बुडतील इतके पाणी ) पाणी टाकून झाल्यावर आपल्या लॉब्स्टरच्या रस्याला १० मिनिटे उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यावर गॅस बंद करून सुंदर प्लेटिंग तयार करून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *