• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

liver fry – कलेजी फ्राय

साहित्य – १ किलो बकर्याची कलेजी, २ tbl spn आले लसणाची पेस्ट, ३ बारीक चिरलेले कांदे, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट ( ४ tbl spn ) , २ बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १५ ते २० पुदिन्याची पाने, ४ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, अर्धा चमचा ( tbl spn ) हळद , चवीनुसार मीठ.

कृती – प्रथम एका तव्यावर तेल गरम करून त्यात २ पात्तळ चिरलेल्या मिरच्या आणि आले लसणाच्या पेस्ट ची फोडणी द्यावी व सोबत थोडी कोथिंबीर फोडणीत टाकावी. पेस्ट लालसर झाल्यावर त्यात कांदा देखील सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावा. कांदा टाळून झाल्यावर त्यात कलेजी टाकावी व ५ मिनिटे परतून घ्यावी. ५ मिनिटानंतर त्यात ४ tbl spn  ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, अर्धा ( half tbl spn )  हळद टाकावी. १००ml कोमट पाणी टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे आणि झाकण ठेवून वाफेवर किमान १० मिनिटे शिजवून घ्यावे. ( पाणी टाकल्याने मसाले चांगले व्यवस्थित एकजीव होतील आणि मसाला देखील खाली चिकटून राहणार नाही. ) १० मिनिटानंतर यात  भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर , पुदिन्याची पाने  आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या आणि पुन्हा १५ मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. ( कलेजी सुकी बनवायची आहे म्हणून जर पाणी थोडे यात दिसून येत असेल तर ते पाणी आटवून घ्यावे ) शिजत असताना मध्ये मध्ये सर्व मिश्रण परतून घ्यावे म्हणजे मसाले एका जागी राहून खाली लागणार नाहीत. १५ मिनिटानंतर गॅस बंद करून कलेजी एका सुंदर बाउल मध्ये काढून घ्या. आपल्या आवडी प्रमाणे सजवून घ्या आणि कलेजी  तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *