• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

koli special haldi ceremony mutton curry – हळदी सोहळ्यातील मटण

साहित्य– ५०० ग्रॅम बकऱ्याचे मटण, २ कांदे स्लाईस मध्ये काप केलेले, १ बटाट्याच्या फोडी, २ इंच आले आणि १५ लसूण पाकळ्या, एक वाटी भाजलेले सुखं खोबरं, २ हिरव्या मिरच्य, मूठभर कोथिंबीर, २ टेबल स्पून सिक्रेट कोळी मसाला  १ टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ.

कृती – सर्वप्रथम मिरची, कोथिंबीर आणि भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पाट्यावर किंव्हा मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्या. सोबत आले आणि लसूण हे ठेचून घ्या. एक कढईत ४ टेबल स्पून तेल घेऊन चांगले तापवून घ्या. त्यात कांदे पारदर्शक होई पर्यंत चांगले खरपूस परतून घ्या. कांदे परतून झाल्यावर त्यात ठेचलेले आले आणि लसूण टाका. परतून घ्या. आता यात हळद आणि आपला सिक्रेट कोळी मसाला टाका.  मसाला चांगला एकजीव करून घ्या. आता यात मटण टाका. मटण या मसाल्यात साधारण ५ मिनिटे चांगले परतून घ्या. मटण चांगले परतून झाल्यावर यात गरम पाणी थोडे थोडे करून टाका. चांगले मिक्स करून घ्या. आता यावर झाकण ठेवून चांगले वाफेवर कमीतकमी ३० मिनिटे शिजवून घ्या. ( मध्ये मध्ये परतत राहा. पाणी कमी झाले असेल तर पुन्हा गरम पाणी टाका. थंड पाण्याचा वापर यात करू नये. ) या मध्ये आता आपण सुरुवातीला जे वाटण तयार केले आहे ते यात टाकावे आणि पुन्हा चांगले मिक्स करून घ्यावे. ५ मिनिटे झाकण न ठेवता एक उकळी काढून घ्या म्हणजे आपलं वाटण यात चांगला सेट होईल. आता यात बटाटी आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. पुन्हा आता सर्व मिश्रणाला झाकण न ठेवता १५ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मटणाला १५ मिनिटे चांगले उकळून घेतल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मटण गरमागरम सर्व्ह करावे.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *