• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Koli Mutton Masala – कोळी मटण मसाला

साहित्य – १ किलो ताजे मटण, २ बारीक चिरलेली टोमॅटो, २ मोठे चमचे आले लसणाची पेस्ट, एक मोठी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक मोठा चमचा हळद, ३ लांब आणि पात्तळ चिरलेले कांदे , चवी नुसार मीठ

कृती – एका कढईत २ चमचे तेल टाकून चांगले तापवावे ( या अधिक तेल वापरू नये कारण मटणातून सुद्धा तेल आणि पाणी सुटते ). तेल चांगले तापल्यावर त्यात कांदा टाकून चांगला तांबूस लालसर रंगा पर्यंत परतून घ्यावा. कांदा लालसर झाल्यावर आता यात २ चमचे आले लसणाची पेस्ट टाकावी आणि खरपूस परतून घ्यावी. तिन्ही साहित्य चांगले परतून झाल्यावर यात १ मोठा चमचा हळद टाकावी, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. हळद आणि मसाला या मिश्रणात १ मिनिटापर्यंत घोळून घ्यावा. आता या मसाल्यात मटण टाकावे आणि मसाल्यात चांगले एकजीव करावे. आता कढई वर झाकण ठेवून त्याला वाफेवर साधारण १५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे. ( मटण शिजत असताना ५ -५ मिनीटांनी मटणावर गरम पाणी शिंपडून ते वर खाली परतून घ्यावे. ( यात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. गरज भासली तरच पाणी वापरावे ; नाहीतर मटणातून सुद्धा पाणी सुटते. ) १५ मिनिटे झाल्यावर आपण मटण पाहू शकता कि बऱ्यापैकी मऊ झाले असेल आणि यात हलके पाणी सुद्धा सुटलेले असेल . आता यात बारीक चिरलेली टोमॅटो टाकावीत ( सुरुवातीला टोमॅटो टाकू नयेत , जर सुरुवातीला टोमॅटो टाकलीत तर मटण लवकर शिजणार नाही.) वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. सर्व मिश्रण चांगले पुन्हा एकजीव करावे. टोमॅटो शिजे पर्यंत वर पुन्हा झाकण ठेवावे ( साधारण ३ मिनिटे ठेवावे ) आता यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी. पुन्हा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. चवी नुसार मीठ टाकावे. ( जर आपण सुरुवातीला यात कांदा शिजण्यासाठी मिठाचा वापर केला असेल तर मीठ संभाळूनच टाकावे ) मीठ टाकून झाल्यावर सर्व मिश्रण एकजीव करावे. आता १५ मिनिटे मध्यम आचेवर पुन्हा झाकण ठेवून शिजवावे ( मटण शिजत असताना मध्ये मध्ये वर खाली परतून घ्यावे ) १५ मिनिटांनंतर गॅस बंद करावा. आपला कोळी मटण मसाला तय्यार. या डिशचा आस्वाद आपण गरमागरम भाकरी सोबत अथवा वाफाळत्या भाता सोबत घेऊ शकता.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *