• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

kinara special prawns curry – किनारा स्पेशल कोलंबी करी

साहित्य – ५०० ग्रॅम ताजी कोलंबी, एक वाटी ओले खोबरे , ३ ओल्या लाल मिरच्या, ८ ते ९ लसुन पाकळ्या, एक छोटा तुकडा आले, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक वाटी पात्तळ चिरलेला कांदा, ५ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि ४ मोठे चमचे तेल.

कृती – प्रथम कोलंबीची डोकी वेगळी करून कोलंबी आणि डोकी स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यांत ४ ग्लास पाणी घेऊन किमान ४० मिनिटे हि डोकी चांगली उकळवून त्याचा स्टॉक तयार करा. आता एका पातेल्यात एक चमचा तेल घेऊन त्यात कांदा, ओले खोबरे, लसुन पाकळ्या, एक छोटा तुकडा आले आणि ३ ओल्या लाल मिरच्या हे लालसर भाजून घ्या. सर्व जिन्नस भाजून झाल्यावर त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करा. नंतर पातेल्यात ४ चमचे तेल गरम करून त्यात हि पेस्ट ५ मिनिटे परतून घ्या. पेस्ट परतून झाल्यावर त्यात १ चमचा हळद आणि ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकून वाटणातून तेल बाजूला होई पर्यंत सतत परतत राहा. वाटणातून तेल बाजूला झाल्यावर त्यात कोलंबी सोडा आणि वाटणात चांगली गोळून तिला ५ मिनिटे परतून घ्या. कोलंबी परतून झाल्यावर त्यात कोलंबीचा स्टॉक टाका जो आपण डोकी चांगली उकळवून त्याचा स्टॉक तयार केला आहे. स्टॉक टाकल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ टाकून हि करी १५ ते २० मिनिटे चांगली उकळवून घ्या. आता आपली किनारा स्पेशल कोलंबी करी तयार आहे . हि करी आपण वाफाळत्या भाता सोबत किंव्हा भाकरी सोबत खावू शकता.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *