
homemade regular daal – गोडी डाळ
साहित्य – १०० ग्रॅम तूरडाळ, ५० ग्रॅम मुगडाळ, १ टोमॅटो बारीक काप केलेले, १०-१२ ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि १०-१२ कडीपत्त्याची, २ हिरव्या मिरच्या बारीक काप केलेल्या, २ सुक्या लाल मिरच्या, १ छोटा लहान तुकडा गुळाचा, ३ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, एक कोकमाची पाकळी, २ tbl spn ओल्या नारळाचा खीस, १/२ tea spoon हिंग, 1 tbl spn जिरे, 1 tbl spn राई, 1 tea spn हळद आणि चवीनुसार मीठ.
कृती – सर्व प्रथम भांड्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात राई जिरे टाका. राई जिरे तेलात तडखायला लागले कि त्यात ठेचलेला लसूण आणि कडीपत्त्याची पाने टाका, हिंग टाकून घ्या, सुक्या मिरच्या मोडून टाका, हिरव्या मिरच्या टाका, हळद टाका, थोडी फोडणीला बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि सर्व मिश्रण एकजीव करून परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात टोमॅटो टाका. टोमॅटो फोडणीत थोडी नरम झाली कि त्यात शिजवलेली डाळ टाका. (तूरडाळ आणि मूग डाळ मिक्स करून घ्या. स्वच्छ धुवून घ्या. त्यात १ ते डिड ग्लास पाणी टाकून कुकरला ४ शिट्या घेऊन घट्ट शिजवून घ्या.) आता यात २ वाट्या पाणी टाकून घोळून घ्या. नंतर एक कोकम पाकळी टाका. गुळाचा खडा टाका, २ चमचे नारळाचा खीस टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि चवीनुसार मीठ टाकून १० मिनिटे मोठ्या आचेवर उकळी काढा. आपली गरमागरम घरगुती पद्धतीतली गोडी डाळ तय्यार !
There are no comments