Dry egg masala – अंड्याचा सुका मसाला
साहित्य – ७ ते ८ उकडलेली अंडी, २-३ बारीक चिरलेले कांदे, एक मोठी वाटी बारीक चिरलेली टोमॅटो, १ tbl spn कसुरी मेथी, ३ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक छोटा चमचा (tea spn) हळद, १ tbl spn साजूक तूप, एक चमचा भाजलेले जिरे, ३ बारीक चिरलेल्या मिरच्या ( अधिक तिखट हवं असल्यास कमी अधिक करू शकता ), अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर (३० ग्रॅम), २ चमचे क्रश केलेले आले लसूण आणि चवीनुसार मीठ.
कृती – एका पॅनमध्ये २ चमचे तेल टाकावे. त्यात आता उकडलेली अंडी टाकावीत. यात आता हलकी हळद टाकावी. चिमूटभर कोळी मसाला टाकावा. अंडी या मसाल्यात परतून घ्यावीत. परतून झाल्यावर अंड्यांना बाजूला काढून घ्यावेत. एका कढईत ३ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे. तेल तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून लालसर रंगापर्यंत परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली मिरची टाकावी. क्रश केलेले आले लसूण टाकावे. सर्व मिश्रण खरपूस भाजून घ्यावे. सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकावीत आणि ती मेल्ट होई पर्यंत परतून घ्यावी. आता यात हळद टाकावी. ३ tbl spn सिक्रेट कोळी मसाला टाकावा. मसाला चांगला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर यात आता उकडलेली अंडी टाकावीत. सर्व अंडी मसाल्यात चांगली मुरवून (मिक्स) घ्यावी. अंडी परतून झाल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. कसुरी मेथी टाकावी (कसुरी मेथीला गरम तव्यावर हलकी परतून घ्या. त्यानंतर ती हातावर कुस्कुरून टाकावी.) आता चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगले एकजीव करून घ्यावे. एक चमचा साजूक तूप टाकावे. साजूक तूप टाकल्याने एक चांगला सॉफ्ट फ्लेवर मिळतो. जर आपणास पसंत नसेल तर आपण नाही टाकले तरी चालेल. आता यात १ ग्लास साधे पाणी टाकावे. वर झाकून ठेवून किमान १० मिनिटे सर्व मिश्रणाला वाफ काढून शिजवून घ्यावे. आपला अंड्याचा सुका मसाला तय्यार.. गरमागरम भाकरी सोबत हि डिश सर्व्ह करावी.
There are no comments