
dry bombil chutney – सुख्या बोंबलाची चटणी
साहित्य – २० ते २५ सुखे बोंबील, हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक इंच आले, मुठभर कोथिंबीर,३ ते ४ हिरव्या मिरच्या, ८ ते ९ लसुन पाकळ्या आणि ३ चमचे तेल.
कृती – सर्व प्रथम आले लसुन,मिरची आणि कोथिंबीर ची पेस्ट करून घ्यावी. सुखे बोंबील एक एक करून विस्तवावर खरपूस भाजून घ्यावे. सुखे बोंबील भाजून झाल्यावर एका कोमट पाण्यात सर्व बोंबील ५ मिनिटे भिजवून बाहेर काढावेत. आता हे बोंबील मिक्सरला जाडसर फिरवून घ्यावे एकदम आपल्याला पावडर नाही बनवायची. जर आपल्या जवळ पाटा असेल तर त्यावर ठेचून ठेचून बारीक करू शकता. आता हा बोंबलाचा चुरा एका भांड्यात काढून घ्यावा. आता यात एक छोटा चमचा हळद टाकावी. २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. दीड चमचे आपण तयार केलेली हिरवी पेस्ट टाकायची आणि आपल्या चवी नुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. आता एका कढईत २ मोठे चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे. तेल चांगले तापल्यावर सुख्या बोंबलाचे सर्व मिश्रण यात टाकावे. हे सर्व मिश्रण तेलात सारखे परतत राहायचे. ग्यास मंद आचेवर ठेवून किमान १५ मिनिटे सतत परतवून चटणी अतिशय कुरकुरीत करायची. नंतर एका छान वाटीत हि चटणी काढून घ्यावी. तयार आहे सुख्या बोंबलाची कुरकुरीत, झणझणीत आणि चटपटीत चटणी. हि चटणी आपण काचेच्या बरणीत भरून साधारण ५ दिवस गरमागरम भाकरी सोबत खावू शकता.
I like most