
crispy bombil fry – कुरकुरीत बोंबील फ्राय
साहित्य – ९ ते १० मध्यम ओले बोंबीलचे तुकडे, २ चमचे लिंबाचा रस, ३ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुन पाकळ्या, एक इंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर, १ चमचा हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि डीप फ्राय करण्यासाठी तेल.
कृती – प्रथम बोंबील स्वच्छ धुवून त्याला मधून एक चीर पाडून घ्यावी . आता ३ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुन पाकळ्या, एक इंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हि पेस्ट किमान २ चमचे बोंबील वर टाकायची. नंतर एक चमचा हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, २ चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून बोंबील चांगले एकजीव करून घ्यावे आणि २० मिनिटे मुरवून घ्यावे. एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासठी ठेवावे . एका प्लेट मध्ये एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाचे पीठ मिक्स करून त्यात एक एक बोंबील चांगला कोट करून घ्यावा ( रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात चांगला दोन्ही बाजूने घोळून घ्यावा ). आता एक एक करून बोंबील गरम तेलात तळण्याकरिता सोडवा. तळताना दोन्ही बाजूने लालसर कुरकुरीत करून घ्यावा. तयार कुरकुरीत बोंबील गरमागरम सर्व्ह करावे.
There are no comments