
coconut barfi – नारळाची बर्फी
साहित्य – ३ नारळाचा खीस, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, १०० ग्रॅम साजूक तूप, ४०० ग्रॅम साखर ( गोड कमी हवे असल्यास प्रमाण कमी करू शकता. ), १/२ tbl spn वेदोड्याची पूड, १५० ग्रॅम काजू पावडर, ३ थेंब लेमन फूड कलर, १०० ग्रॅम खवा (मावा), १/२ tbl spn मीठ आणि बर्फीवर लावण्याकरिता चांदीचा वर्क.
कृती – सर्वप्रथम एका पॅनमध्ये साजूक तूप टाकून तापवून घ्यावे. तूप तापल्यावर त्यात साखर टाकावी आणि हलकी तुपात अर्धी विरघळून घ्यावी. साखर हलकी विरघळू लागल्यावर यात ओल्या नारळाचा खीस आणि वेलदोड्याची पूड टाकून घ्या. सर्व मिश्रण एकजीव करून त्याला २-३ मिनिटे परतून घ्या. आता यात मावा कुस्कुरून टाका. मावा चांगला नारळाच्या मिश्रण मध्ये एकजीव करून घ्या. ( गॅसची आच मंद गतीवर ठेवा. ) यात आता मीठ टाकून घ्या. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून किमान १० मिनिटे परतून घ्या. एका खोलगट थाळीमध्ये थोडं तूप फिरवून घ्या, म्हणजे वड्या खाली थाळीला चिकटून राहणार नाहीत. आता तयार मिश्रण अर्धे थाळीला पसरवून सेट करून घ्या. थाळीमध्ये आपली पहिली लेअर तयार. आता दुसऱ्या लेअर मध्ये उरलेल्या मिश्रणात लेमन फूड कलर टाका आणि मश्रण मिक्स करून घ्या. आता हे तयार मिश्रण थाळीवर टाका आणि पसरवून सेट करून घ्या. थाळीमध्ये आपल्या दोन रंगांच्या लेअर तय्यार !… आपण एकच लेअर किंव्हा विविध रंगांच्या आपल्या आवडीनुसार अनेक लेअर बनवू शकता. या थाळीला ३० मिनिटांकरिता फ्रिज मध्ये ठेवावे, म्हणजे संपूर्ण मिश्रण थंड होऊन चांगले सेट होईल आणि त्याच्या बर्फीसाठी लागणाऱ्या वड्या देखील सहज सुंदर पडतील. मिश्रण सेट झाल्यावर त्यावर चांदीचा वर्क लावावा आणि त्याच्या चौकोनी आकारात वड्या पाडून घ्याव्या. नारळाची बर्फी आता तय्यार झाली आहे. प्रत्येक बर्फीवर ड्रायफ्रूट्स लावून छान संजवून घ्यावी.
There are no comments