
chicken sukka – चिकन सुक्का
साहित्य – १ किलो चिकन, एक वाटी कोथिंबिर, २-३ कांदे बारीक काप केलेले, १५-१६ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, २ इंचाचे आले, एक वाटी भाजलेले सुके खोबरे (१०० ग्रॅम), २ टोमॅटो बारीक काप केलेले, १/२ tbl spn हळद, ३-४ tbl spn सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ.
कृती – एका पातेल्यात ४ tbl spn तेल टाकून चांगले तापवत ठेवा. पाट्यावर किंव्हा मिक्सर मध्ये आले,लसूण आणि मिरची क्रश करून घ्या. ( यात पेस्ट देखील चालू शकेल ), तेल चांगले तापल्यावर त्यात कांदा तांबूस रंगापर्यंत तापवून घ्या. कांदा तांबूस झाल्यावर त्यात आले, लसूण आणि मिरची क्रश टाका आणि परतून घ्या. नंतर यात बारीक काप केलेली टोमॅटो टाका आणि टोमॅटो विरघळे पर्यंत चांगली शिजवून घ्या. आता यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाका आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर यात चिकन टाकून घ्या. चिकन सर्व मसाल्यात चांगले एकजीव करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून ५ मिनट वाफेवर शिजवत ठेवा. मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, इंचाचे आले, भाजलेले सुके खोबरे घेऊन त्यात थोडे पाणी टाकून घट्ट वाटण तयार करून घ्या. ५ मिनटे वाफ काढून झाल्यावर त्यात हे वाटण टाकून घ्या. सोबत चवीनुसार मीठ देखील टाका. यात पाणी टाकण्याची आवशक्यता नाही. चिकनमधून देखील थोडेफार पाणी सुटते. चिकन पुन्हा चांगले मिक्स करून घ्या आणि १०/१५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. ( मध्ये मध्ये परतत राहा ). १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम चिकन सुक्का सर्व्ह करा. आपला चिकन सुक्का तय्यार !
There are no comments