• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Chakli Bhajni – खमंग चकली भाजणी

साहित्य – ५०० ग्रॅम तांदूळ (भाकरी तांदूळ), २५० ग्रॅम चणा डाळ, ६० ग्रॅम मुगडाळ, ५० ग्रॅम गहू, ५० ग्रॅम उडदडाळ, ५० ग्रॅम ज्वारी, १०-१२ लवंग, १/२ tbl spn काळीमीरी, दीड इंच दालचीनी, २ tbl spn जिरे, १ tbl spn ओवा, २ tbl spn मेथी, ३० ग्रॅम धणे आणि ५० ग्रॅम पोहे.

कृती – कढईत मंद आचेवर तांदूळ हलका भाजून घ्यावा. तांदळाला शेक लागायला सुरुवात झाली कि त्याला एका परातीत किंव्हा भांड्यात काढून घ्यावा. आता कढईत चणाडाळ टाकावी आणि तांबूस परतून भाजून घ्यावी. त्याच प्रमाणे मुगडाळ, गहू, उडदडाळ, ज्वारी देखील भाजून घ्याव्यात. आता कढईत काळीमीरी, दालचीनी, जिरे, ओवा, मेथी, धणे इत्यादी टाकून भाजून घ्याव्यात. सर्व मसाल्यांतून त्यांचा सुगंध सुटायला सुरुवात झाली कि ते देखील काढून घ्याव्यात. आता कढईत पोहे टाकावेत आणि पोहे कुरकुरीत होई पर्यंतच भाजावेत. आता सर्व मिश्रण एकत्रित करून जाडसर दरीदरीत दळून घ्यावेत. चकली भाजणी तय्यार !

टीप : तांदूळ प्रथम धुवून, कोरडे करून त्यांना उन्हात सुकवून घ्या. तांदूळ चांगले सुकवून झाल्यानंतरच त्यांना भाजून घ्यावे. चकली भाजणीसाठी लागणारे साहित्य एकत्रित करून भाजू नये. त्यांना वेगवेगळेच भाजावे. कारण प्रत्येक पदार्थाला भाजण्यासाठी एक विशिष्ठ वेळ लागतो.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *