• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Chakli – भाजणीची चकली

साहित्य : ५०० ग्रॅम चकली भाजणी पीठ, ३ tbl spn तीळ, ३ tbl spn लाल मिर्ची पावडर, १ tbl spn ओवा, १/२ tbl spn तेल, १ tea spn हिंग, १ tea spn  हळद, १ १/२ tea spn लोणी (butter) आणि चवीनुसार मीठ.

कृती : सर्व प्रथम उकड तयार करून घ्यायची, त्यासाठी एका पातेल्यात ५०० ग्रॅम पिठासाठी साधारण १ ग्लास पाणी टाकून मोठ्या आचेवर उकळून घ्यावे. उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात २ tbl spn तीळ, लाल मिर्ची पावडर, ओवा, तेल, हिंग, हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यावे. सर्व मिश्रण मिक्स करावे. आता यात चकली भाजणी पीठ टाकून आपण जशी उकडीच्या भाकरीसाठी उकड काढतो तशीच या पिठाची उकड काढावी. उकड काढून झाल्यानंतर पिठाला एका परातीत काढून घ्यावे. उकड जास्त थंड होऊ देऊ नका. उकड गरम असतानाच थोडे हळूहळू साधे पाणी शिंपडून पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतर त्यात उरलेले १ tbl spn तीळ वरून टाकून मिक्स करावे. (वरून पुन्हा तीळ टाकल्याने चकलीच्या बाहेरून तीळ दिसू लागतात आणि त्या दिसायलाहि आकर्षित दिसतात.) दोन्ही हातावर लोणी लावून पुन्हा पीठ मळून घ्यावे. एका कढईत मध्यम आचेवर चकल्या बुडतील इतके तेल टाकून उकळत ठेवावे. तेल उकळत आहे तोपर्यंत चकलीच्या साच्यात ६ आर्यांची पात टाकून त्यात पिठाचा गोळा टाकावा आणि गोल गोल चकल्या पाडून घ्याव्यात. उकळत्या तेलात एक एक करून चकल्या तळण्यासाठी सोडाव्यात. चकल्या सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावात. चकल्या तळून झाल्यावर त्यांना टिशू पेपरवर काढून घ्याव्यात. आपल्या कुरकुरीत, खमंग आणि स्वादिष्ट अशा चकल्या तय्यार !

टीपपिठात लोणी एकजीव केल्याने चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात पण लोणी आणि तेल वरील दिलेल्या साहित्यांप्रमाणेच घ्यावे. नाहीतर चकल्या तेलात सोडल्यावर तुटण्याची किंव्हा विरघळण्याची शक्यता असते. चकली तेलात सोडल्यावर त्यातून जलद गतीने बुडबुडे बाहेर येत असतात, म्हणजेच चकली शिजण्याची प्रक्रिया हि कार्यरत आहे असे समजावे आणि चकली मधून बुडबुडे येणे बंद झाले किंव्हा कमी झाले कि त्या तय्यार आहेत असे समजावे. चकली तयार झाली कि चकली भोवती सोनेरी-तपकीरी रंग सुद्धा चढतो.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *