• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

cabbage patties – कोबीच्या वड्या

साहित्य – ५०० ग्रॅम खिसलेला किंव्हा बारीक चिरलेला कोबी, ५ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tbl spn धणे पावडर, १ tea spn हिंग, ३०० ग्रॅम चण्याचे पीठ ( बेसन ), १ tbl spn जिरे, २ tbl spn राई, १ tea spn हळद, २ tbl spn तीळ, २ tbl spn आले लसणाची पेस्ट, ५० ग्रॅम ओल्या नारळाचा खीस, ३ बारीक चिरलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ.

कृती – सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात खिसलेला किंव्हा बारीक चिरलेला कोबी घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे पावडर ( जर अख्खे धणे घेत असाल तर ते खलबत्त्यात थोडे कुटून घ्यावे. ), हिंग, जिरे, १ tbl spn राई, हळद, १ tbl spn तीळ, आले लसणाची पेस्ट, ओल्या नारळाचा खीस, बारीक चिरलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ इत्यादी सर्व साहित्य टाकून चांगले एकजीव करून घ्या. (यात पाण्याचा वापर करू नये. कोबीत मीठ टाकल्याने त्यातून बरेच पाणी बाहेर येते.) सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात चण्याचे पीठ थोडे थोडे करून घालून घ्या. आता पुन्हा मिश्रण एकजीव करा. वाफेवरच्या भांड्यात ( steamer pot ) ४ ग्लास पाणी टाकून उकळत ठेवा. दोन्ही हाताच्या सहाय्याने कोबीचे मिश्रण एकत्र करून हलक्या हाताने गोल रोल करून घ्यावे. आता वाफेवरच्या चाळणीला थोडे तेल चोळून घ्या, म्हणजे कोबीचे रोल खाली चिकटणार नाहीत. चाळण भांड्यावर सेट करा आणि त्यात कोबीचे रोल ठेवा. ( कोबीचे रोल एकावर एक किंव्हा अगदी चिकटून जवळ ठेवू नये. ) भाड्यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर किमान १५ मिनिटे वाफ काढा. १५ मिनिटांनंतर गॅस बंद करून कोबीचे रोल प्लेट वर काढून घ्या. रोल थंड होऊ द्या. रोल थंड झाल्यावर समांतर वड्या पडतील असे काप करून घ्या. एका पॅन मध्ये ३ ते ४ tbl spn तेल चांगले तापवून मध्यम गॅस वर कोबीच्या वड्या दोन्ही बाजूने तांबूस रंगापर्यंत तळून घ्या. वड्या तळून झाल्यावर एका टिशू पेपरच्या डिश मध्ये काढून घ्या. आता पुन्हा त्याच पॅन मध्ये २ tbl spn तेल गरम करून त्यात उरलेले राई आणि तीळ टाकून यांची फोडणी करून घ्या. गरम राई आणि तिळाची फोडणी कोबीच्या वड्यांवर पसरवून घाला. या फोडणीने एक सुंदर आणि खरपूस असा सुगंध कोबीच्या वड्यांना येईल. आपल्या खमंग कोबीच्या वड्या तय्यार !

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *