• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

bheja fry – भेजा फ्राय

साहित्य – बकऱ्याचे दोन भेजे, एक वाटी कोथिंबीर, ९-१० लसूण पाकळ्या आणि अर्ध्या इंचाचे आले, ३ हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस १ tbl spn, १ tea spn  हळद, २ tbl spn सिक्रेट कोळी मसाला, तळण्याकरिता तेल, चवीनुसार मीठ.

कृती – सर्व प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि आले, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस टाकून या सर्वांची बारीक पेस्ट करून घ्या. आता एका प्लेट मध्ये भेजे हलक्या हाताने धुवून घ्या. त्या वर हि पेस्ट टाका. हळद टाका आणि सोबत सिक्रेट कोळी मसाला टाका. आपल्या चवीनुसार मीठ टाका. एका पॅन मध्ये ३ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात भेजे फ्राय करण्यासाठी सोडा. गॅस मंद आचेवर ठेवा. ७-८ मिनिटानंतर भेजाची दुसरी बाजू देखील फ्राय करून घ्या. भेजे फ्राय झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून सजवून घ्या आणि भाकरी सोबत सर्व्ह करा.

2 Comments

  1. Vijay Yetam says:

    खुप छान

  2. Kawya krushank Kadam says:

    Khup chan….yammy

Leave a Reply to Vijay Yetam Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *