baby shrimp Crispy pakoras – ओल्या जवल्याची भजी
साहित्य – २५० ग्रॅम ओला जवला, १०० ग्रॅम चण्याचे पीठ (बेसन), ५० ग्रॅम तांदळाचे पीठ, ४ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ आले, १५ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या, वाटण्यासाठी मूठभर कोथिंबीर, ३-४ tbl spn चिंचेचा कोळ, १/२ tea spn हळद, २ tbl spn सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ.
कृती – जवला २ पाण्यात धुवून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, मिरची, आले आणि लसूण घेऊन त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. एका मोठ्या भांड्यात चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी पेस्ट, चिंचेचा कोळ, हळद, सिक्रेट कोळी मसाला टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात जवला टाकावा. जवला मिश्रणात हलक्या हाताने एकजीव करावा. कढईत भजी बुडतील इतके तळण्यारिता तेल टाकून गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जवल्याच्या भज्या करून त्यात एका मागोमाग एक करत सोडाव्यात. गॅसची आच मध्यम ठेवा. भज्या जास्त मोठ्या आकारात ठेवू नये, नाहीतर आतून कच्च्या राहण्याची शक्यता आहे. तेलात भजी वर खाली करून घ्या. भज्यांना तांबूस रंग येऊ लागला कि टिशू पेपरच्या डिश वर सर्व भज्या काढून घ्याव्यात. गरमागरम कुरकुरीत ओल्या जवल्याच्या भजी तय्यार !
There are no comments