• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Aloo Brinjal sabzi – वांगी बटाट्याची भाजी

साहित्य – एक मोठं काळं वांगं, २ कांदे बारीक चिरलेले, १/२ वाटी भाजेलेलं सुकं खोबरं, १/२ वाटी ओल्या नारळाचा खीस, २ टोमॅटो मध्यम आणि उभे काप केलेले, १ मोठा बटाटा उभा काप केलेला, १/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ४ तेजपत्ते, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १५ लसूण पाकळ्या, १ इंच आले, ४ हिरव्या मिरच्या, ९-१० कडीपत्त्याची पाने, १/२ tea spn हिंग, १५ ग्रॅम गूळ, १/२ tbl spn राई, १/२ tbl spn जीरे, १ tea spn हळद, २ १/२ tbl spn सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ.

कृती – सर्वप्रथम आले, लसूण, मिर्ची, भाजलेले सुके खोबरे, ओले खोबरे आणि कोथिंबीर पाट्यावर किंव्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन या भाजीसाठी लागणारे बारीक वाटण तयार करून घ्या. एका खोलगट भांड्यात ४ tbl spn तेल टाकून तापवून घ्या. तेल तापल्यावर यात फोडणीला राई-जीरे टाका. राई-जीरे तडखायला लागले कि हिंग, कडीपत्त्याची पाने आणि सोबत तेजपत्ते टाका. हलके परतून घ्या. आता यात कांदा टाका आणि तांबूस रंगापर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर यात हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाका. मसाला परतून घ्या. मसाला पेरून झाल्यानंतर यात बटाटे आणि टोमॅटो टाका. परतून घ्या. आता यात तयार केलेले वाटण टाका. अर्धी वाटी साधे पाणी टाकून वाटण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या. आता भांड्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढा. वाफ काढून झाल्यानंतर यात वांगी टाका. ( वांगी हि बटाट्यासोबत शिजवण्याकरिता टाकू नका, कारण वांगी मऊसर असल्यामुळे ती ओव्हर कूक होऊ शकतात. ) वांगी या मिश्रणात चांगली एकजीव करून घ्या. यात आता गुळाचा खडा, शेंगदाण्याचे कूट आणि सोबत चवीनुसार मीठ देखील टाकून घ्या. सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. वर पुन्हा झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. मध्ये मध्ये परतत रहा, म्हणजे भाजी खाली बुडाला लागणार नाही. १० मिनिटानंतर गॅस बंद करून भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडा आणि गरमागरम चपाती किंव्हा भाकरी सोबत सर्व करा. वांगी बटाट्याची भाजी तय्यार !

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *